Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटामागे 'अल-कायदा'! UNच्या अहवालातून मोठा खुलासा; 'जैश'चे नाव पुढे करुन खेळला खतरनाक खेळ

Delhi Red Fort Blast Al Qaeda UN Report: दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका ताज्या अहवालातून अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा समोर आला.
Delhi Red Fort Blast Al Qaeda UN Report
Delhi Red Fort BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Red Fort Blast Al Qaeda UN Report: दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका ताज्या अहवालातून अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा समोर आला. संयुक्त राष्ट्राच्या ‘ॲनालिटिकल सपोर्ट आणि सँक्शन्स मॉनिटरिंग’ टीमच्या 38व्या अहवालात या आत्मघाती हल्ल्याचा थेट संबंध 'अल-कायदा' या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी जोडण्यात आला.

यापूर्वी दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे सुरक्षा यंत्रणा त्या दिशेने तपास करत होत्या. मात्र, आता युएनच्या या अधिकृत अहवालाने तपास यंत्रणांची चिंता वाढवली असून अल-कायदाने भारतात पुन्हा पाय रोवल्याचे स्पष्ट संकेत दिले.

Delhi Red Fort Blast Al Qaeda UN Report
Delhi Metro Crime: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

अहवालानुसार, अल-कायदाने गेल्या काही वर्षांत आपल्या रणनीतीमध्ये मोठा आणि धोकादायक बदल केला आहे. ही संघटना आता मोठे गट तयार करुन हल्ला करण्याऐवजी वेगवेगळ्या भागात पसरलेल्या छोट्या 'स्लीपर सेल्स'च्या माध्यमातून दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे. याशिवाय, अल-कायदाने भारतात आपले मजबूत लॉजिस्टिक आणि आर्थिक नेटवर्क देखील विकसित केले आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लाल किल्ल्यावरुन मेट्रो स्टेशनकडे जाणाऱ्या एका चालत्या ह्युंदाई आय-20 कारमध्ये हा भीषण स्फोट झाला होता. या दुर्दैवी घटनेत 11 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर दोन डझनापेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते.

Delhi Red Fort Blast Al Qaeda UN Report
Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

या अहवालात अल-कायदा (Al Qaeda) आणि इस्लामिक स्टेट या दोन्ही संघटनांच्या वाढत्या ताकदीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. हे दोन्ही गट गेल्या अनेक दिवसांपासून केमिकल आणि बायोलॉजिकल शस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांना अद्याप यश आलेले नाही. मात्र, भविष्यात त्यांच्याकडे ही घातक शस्त्रे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अल-कायदा भारताच्या शेजारील देश असलेल्या बांगलादेशातही आपले जाळे वेगाने पसरवत आहे.

Delhi Red Fort Blast Al Qaeda UN Report
Delhi Restaurant Fire: दिल्लीत रेस्टॉरंटला भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांचा समावेश VIDEO

दरम्यान, दिल्लीतील या लाल किल्ला स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने 11 आरोपींविरोधात तब्बल 7500 पानांची चार्जशीट दाखल केली असून यामध्ये 580 हून अधिक साक्षीदारांचा समावेश आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 27 ऑगस्ट रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com