Guru Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Guru Gochar 2026: नशिबाचा राजा! गुरुच्या नक्षत्र बदलाने 5 राशींच्या जीवनात क्रांती; आरोग्य, संपत्ती आणि सुख-समाधानासाठी सर्वोत्तम काळ

Jupiter Transit Punarvasu Nakshatra 2026: आज (14 मे) सकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी गुरु ग्रहाने पुनर्वसु नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये गोचर केले.

Manish Jadhav

Guru Gochar 2026: आज (14 मे) सकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी गुरु ग्रहाने पुनर्वसु नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये गोचर केले. या नक्षत्रात गुरु देव 2 जून 2026 रोजी पहाटे 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत विराजमान राहतील. ज्योतिषशास्त्रात गुरुला ज्ञान, सुख, संपत्ती आणि विवाहाचा कारक मानले जाते, त्यामुळे या बदलाचा मोठा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. प्रामुख्याने शिक्षण, अर्थकारण, धर्म आणि वैवाहिक जीवन या क्षेत्रांत सकारात्मक बदल दिसून येतील. विशेषतः पाच राशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार असून त्यांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

मेष राशीच्या जातकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन वरदान ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे आता मार्गी लागतील आणि कामाला वेग येईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळेल, ज्यामुळे समाजातील प्रभावशाली व्यक्तींशी तुमचे संबंध दृढ होतील. विशेषतः व्यापारी वर्गाला आजपासून मोठा आर्थिक लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. हा काळ तुमच्या करिअरला (Career) नवीन दिशा देणारा ठरेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना या गोचरमुळे मानसिक शांती लाभेल. जर तुम्ही कौटुंबिक वादांमुळे चिंतेत असाल, तर ते वाद आता संपुष्टात येतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास यशस्वी आणि फलदायी ठरतील. धार्मिक कार्यांमधील ओढा वाढेल, विशेषतः विवाहित महिलांची (Womens) श्रद्धा वाढल्यामुळे त्यांना आत्मिक समाधान मिळेल.

तूळ राशीच्या तरुणांसाठी हा काळ यशाचे शिखर सर करण्याचा आहे. एकाग्रतेने काम केल्यास मोठ्या यशाची प्राप्ती होईल, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. कौटुंबिक वातावरण अनुकूल असल्याने विवाहित जातकांचे जीवन सुखकर राहील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ उत्तम असून कोणतीही मोठी शारीरिक व्याधी उद्भवणार नाही.

कुंभ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष दिल्यास मोठे लाभ होतील. विशेषतः घरातील ज्येष्ठ मंडळी गंभीर आजारांपासून दूर राहतील. या काळात तुम्हाला एखाद्या संताचे दर्शन घडण्याची शक्यता असून धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. आर्थिक आघाडीवरही मोठे यश मिळेल; दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मीन राशीच्या जातकांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा काळ आहे. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील आणि आनंदाचे क्षण अनुभवता येतील. नोकरी करणाऱ्या वर्गाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. विवाहित महिला वादांपासून दूर राहून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील, ज्यामुळे घरातील नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. एकंदरीत, गुरुचे हे गोचर या पाच राशींच्या जीवनात समृद्धी घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT