Horoscope Today April 13, 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope Today: वरुथिनी एकादशीला जुळून आला 'सुवर्ण योग'; विष्णूकृपेने 'या' 4 राशींच्या नशिबात आता फक्त पैसाच पैसा

Horoscope Today April 13, 2026: येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी वरुथिनी एकादशीचा पवित्र योग जुळून येत आहे.

Sameer Amunekar

येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी वरुथिनी एकादशीचा पवित्र योग जुळून येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते. यंदा या दिवशी भगवान विष्णूंच्या विशेष कृपेने काही राशींच्या आयुष्यात भाग्योदयाचे दरवाजे उघडणार आहेत. आचार्य इंदू प्रकाश यांच्या मार्गदर्शनानुसार, आजचा दिवस ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे आणि 'शुभ योगा'मुळे अनेकांसाठी प्रगतीचा ठरणार आहे.

चार राशींना मिळणार विष्णूंची विशेष साथ

आजच्या दिवशी मेष, वृषभ, मिथुन आणि कुंभ या चार राशींसाठी नशिबाची साथ प्रबळ आहे. वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे या राशींच्या जातकांना आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती लाभणार आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असलेल्या 'शुभ योगा'मुळे नवीन कामाची सुरुवात करणे फायदेशीर ठरेल. विशेषतः व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन आला आहे.

कार्यक्षेत्रात प्रगती आणि कौटुंबिक सौख्य

मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे गोड फळ मिळणार असून मुलांशी संबंधित चिंता दूर होईल. तर वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण झाल्यामुळे बँक बॅलन्स वाढण्यास मदत होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑफिसमधील प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि राजकारणात सक्रिय असलेल्यांना मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना सासरच्या मंडळींकडून जुने हेवेदावे संपवून नवीन नाते निर्माण करण्याची संधी मिळेल.

आरोग्य आणि सामाजिक प्रतिष्ठा

सिंह आणि कन्या राशीसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. जोडीदारासोबत धार्मिक सहलीचे नियोजन केल्याने नात्यात अधिक गोडवा येईल. तुळ राशीच्या व्यावसायिकांनी बोलण्यात नम्रता ठेवल्यास नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कष्टाच्या जोरावर कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करता येतील. धनु राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यांना कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल.

सावधानता आणि नवीन संधी

मकर राशीच्या लोकांनी आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांशी शेअर करताना सावध राहावे. जरी सामाजिक प्रतिष्ठा वाढणार असली, तरी आर्थिक व्यवहारात चढ-उतार जाणवू शकतात. कुंभ राशीसाठी आजचा दिवस गुंतवणुकीसाठी 'फेव्हरेबल' असून प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीमुळे भविष्यात मोठा फायदा होईल. मीन राशीच्या व्यक्तींना मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

SCROLL FOR NEXT