Horoscope Today 18 September 2025 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: भाग्याची साथ! मेष-मिथुन राशींसह 'या' 5 राशींचा दिवस मंगलकारी; करिअर, नोकरी व व्यवसायात मिळेल सकारात्मक फळ

Horoscope Today 18 September 2025: आज गुरुवार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी आज रात्री ११:२५ वाजेपर्यंत चालेल. द्वादशी तिथीला जन्मलेल्यांसाठी आज श्राद्ध केले जाईल.

Sameer Amunekar

आज आश्विन कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून गुरुवारचा दिवस आहे. ही तिथी रात्री ११:२५ वाजेपर्यंत टिकणार आहे. आज द्वादशी तिथीचे श्राद्ध करण्यात येईल. रात्री ९:३७ वाजेपर्यंत शिवयोग राहील. तसेच आज अख्खा दिवस व रात्र पार करून उद्या सकाळी ७:०६ वाजेपर्यंत अश्लेषा नक्षत्र टिकणार आहे. चला तर जाणून घेऊया आजचे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींचे भविष्य.

मेष: आज तुमचा दिवस महत्त्वाच्या कामांत जाईल. कुटुंबात सौहार्द वाढेल. मोठी जबाबदारी येऊ शकते. धनलाभाचे अवसर मिळतील. वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. राजकारणातील लोकांना सामाजिक कामांत मान मिळेल.

वृषभ: दिवस उत्तम. नातेवाईकांकडून दिलेले पैसे परत मिळतील. मीडिया व प्रायव्हेट जॉब क्षेत्रात प्रगती. विद्यार्थ्यांना व विशेषतः इंजिनिअरिंग शाखेतील मुलांना नवे अवसर मिळतील.

मिथुन: व्यापारात धनलाभ मिळेल, क्लायंटसोबत संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवनात आनंद. संतानाकडून खुशखबर. ऑफिसमधील पेंडिंग काम पूर्ण होईल.

कर्क: दिवस मिश्र. विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार यश. दांपत्यजीवनात आनंद. धार्मिक कार्यात सहभाग. व्यापारात लाभ. मात्र खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे.

सिंह: करिअरमध्ये प्रगती रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दांपत्यजीवनातील समन्वय वाढेल. नोकरीत सकारात्मक बदल. मित्रांसोबत आनंद. गुंतवणुकीसंदर्भात घरच्यांचा सल्ला लाभदायक राहिल.

कन्या: सामाजिक कार्यात सहभाग. डिझाइनर्सना नवा ऑर्डर. दांपत्यजीवन गोड. कुटुंबात अनुकूल वातावरण. संतानाकडून शुभवार्ता. समाजात सन्मान मिळेल.

तुळ: दिवस चांगला. उत्पन्नात वाढ. विद्यार्थ्यांना यश. भावनिक निर्णय टाळा. नवीन व्यक्तीशी भेट फायदेशीर.

वृश्चिक: प्रयत्नांना यश. अविवाहितांना विवाह प्रस्ताव. मित्रांचा आधार. कायदेशीर बाबतीत दिलासा.

धनु: कुटुंबात तालमेल. आर्थिक स्थिती मजबूत. क्लायंटसोबत मीटिंगमधून उत्तम सूचना. नातेवाईकांकडून भेटवस्तू. संतानाकडून आनंददायक वार्ता.

मकर: गैरसमज दूर होतील. अध्यात्माकडे झुकाव. व्यापाऱ्यांना नफा. घरातील वडिलधाऱ्यांची सेवा करा. पालकांचा स्नेह लाभेल.

कुंभ: दिवस अनुकूल. घरच्यांकडून पुढे जाण्याचा सल्ला. लेखकांना यश व गौरव. आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा. व्यापार उत्तम. शांततेने गोष्टी सोडवा.

मीन: घरात खास पाहुण्यांचे आगमन. कुटुंबात आनंद. महत्त्वाचे कार्य पूर्ण. उर्जेने भरलेला दिवस. नवे उत्पन्न स्रोत. मुलांकडून सेवाभावी कृतीमुळे अभिमान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

Bicholim: बेपत्ता महिला अखेर बेळगावी येथील आश्रमात सापडली, हातुर्लीतील चंद्रिकाचा आठवडाभरापासून सुरू होता शोध

SCROLL FOR NEXT