Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

Aggressive Dogs Ban In Goa: अधिवेशनात ३१ विरुद्ध ६ मतांनी मंजूर झालेल्‍या गोवा पशुसंवर्धन आणि पाळीव प्राणी विधेयकाला राज्‍यपालांनी मंजुरी दिलेली आहे.
Aggressive Dogs Ban
Aggressive Dogs BanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अधिवेशनात ३१ विरुद्ध ६ मतांनी मंजूर झालेल्‍या गोवा पशुसंवर्धन आणि पाळीव प्राणी (नियमन आणि भरपाई) विधेयकाला राज्‍यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी मंजुरी दिलेली आहे.

या कायद्यामुळे कुत्र्यांच्या क्रूर जातींना पाळीव प्राणी म्हणून पाळता येणार नाही. शिवाय त्‍यांची पैदास करण्यासही मनाई असेल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, तीन महिन्यांपर्यंत वाढू शकणारा साधा कारावास, ‘क्रूर’ म्हणून अधिसूचित केलेल्या कुत्र्यांच्‍या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना भरपाई आदी तरतुदी आहेत.

Aggressive Dogs Ban
Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात राज्‍य सरकारने मंजुरी दिलेले गोवा सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०२५ आणि गोवा पशुसंवर्धन-पाळीव प्राणी (नियमन आणि भरपाई) विधेयक : २०२५ ला राज्‍यपालांनी पुसापती अशोक गजपती राजू यांनीही मान्‍यता दिल्‍याने दोन्‍ही विधेयकांचे कायद्यात रूपांतरण झाले आहे.

खासगी विद्यापीठांना कॅम्पस स्थापण्‍यास परवानगी

राज्‍यात सध्‍या गोवा विद्यापीठ हे एकमेव सार्वजनिक विद्यापीठ आहे. त्‍याची स्‍थापना १९८५ साली झाली. त्‍यामुळे राज्‍यात सार्वजनिक विद्यापीठे स्थापन करण्याच्‍या हेतूने सरकारने गोवा खासगी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक अधिवेशनात मांडले.

Aggressive Dogs Ban
Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

शिवाय विरोधकांच्‍या विरोधात ते मंजूरही करून घेतले. आता राज्‍यपालांनी मंजुरी दिल्‍यामुळे खासगी विद्यापीठांना कायमस्वरूपी कॅम्पस स्थापन होईपर्यंत ती कॅम्पसबाहेर स्थापन करण्यास परवानगी मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com