'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

Dashavtar movie Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः या चित्रपटाचा गोव्यातील विशेष प्रीमियर पाहिला
dilip prabhavalkar dashavtar film
dilip prabhavalkar dashavtar filmDainik Gomantak
Published on
Updated on

Dashavtar movie Goa CM Pramod Sawant: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने सजलेला 'दशावतार' हा चित्रपट महाराष्ट्रासोबतच गोव्यामध्येही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः या चित्रपटाचा गोव्यातील विशेष प्रीमियर पाहिला. त्यांनी हा चित्रपट कोकण आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधित्व करत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केले.

"गोव्याच्या संस्कृतीशी जोडलेला सिनेमा"

प्रसिद्ध नट, आणि विविध हिंदी तसेच मराठी चित्रपटांमधून घराघरांमध्ये पोहोचलेले दिलीप प्रभावळकर सध्या एका वेगळ्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः बुधवारी (दि.१७) प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह गोव्यात सिनेमाचा आस्वाद घेतला.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 'गोवा आणि कोकणच्या संस्कृतीशी जोडलेल्या दशावतार या पारंपरिक नाट्यप्रकारावर आधारित हा चित्रपट आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, रवी काळे, सुनील तावडे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यासह सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे काम वाखाणण्याजोगे आहे.' चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

dilip prabhavalkar dashavtar film
CM Pramod Sawant: प्रमोद सावंतांनी मुंबईत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; सुख-समृद्धीची केली प्रार्थना

बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'ची घोडदौड

'दशावतार' हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने ६० लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची घोडदौड सुरू ठेवली आहे.

  • शनिवार, १३ सप्टेंबर: १.४ कोटी

  • रविवार, १४ सप्टेंबर: २.४ कोटी (आतापर्यंतची सर्वाधिक कमाई)

  • सोमवार, १५ सप्टेंबर: १.१ कोटी

  • मंगळवार, १६ सप्टेंबर: १.३ कोटी

  • बुधवार, १७ सप्टेंबर: १.३५ कोटी (अपेक्षित)

चित्रपटाने सहा दिवसांत एकूण ८.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यशाबद्दल बोलताना, निर्मात्यांनीही प्रेक्षकांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com