Bicholim: बेपत्ता महिला अखेर बेळगावी येथील आश्रमात सापडली, हातुर्लीतील चंद्रिकाचा आठवडाभरापासून सुरू होता शोध

bicholim missing woman: गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेली हातुर्ली-मये येथील ७० वर्षीय महिला अखेर बेळगावी येथे सापडली.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेली हातुर्ली-मये येथील ७० वर्षीय महिला अखेर बेळगावी येथे सापडली. या महिलेला बेळगावीहून गोव्यात आणले असून, त्या सुखरूप आहेत, अशी माहिती नातलगांकडून मिळाली आहे.

बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी बेळगावी पोलिस तसेच तेथील युवकांसह स्थानिकांनी बहुमूल्य सहकार्य केल्याची माहिती नातलगांनी दिली. हातुर्ली येथील चंद्रिका (मंगला) फोंडू शिरोडकर ह्या गेल्या बुधवारी (ता. १०) डिचोलीच्या आठवडी बाजारासाठी घराबाहेर पडल्या होत्या.

Bicholim
Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

त्या घरी परतलेल्याच नव्हत्या. चंद्रिका बेपत्ता झाल्यापासून त्यांचा शोध सुरु होता. घरच्यांसह नातलगांकडून तिचा मयेसह डिचोली, साखळी, दोडामार्ग आदी परिसरात शोध घेतला होता. मात्र त्या सापडत नव्हत्या.

Bicholim
Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

नातलगांनी डिचोलीतील शहरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून पाहिले असता, चंद्रिका या कर्नाटकातील बेळगावी जाणाऱ्या बसमध्ये चढल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी तिच्या नातलगांनी बेळगावी गाठून त्यांचा शोध सुरु केला होता. तेथील पोलिसांनाही खबर देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com