Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

Borim areca nut crop damage: मुसळधार पावसामुळे यंदा बोरी, शिरशिरे व राज्‍यातील अन्‍य भागांतील सुपारी उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे.
Crop Damage Goa
Crop Damage GoaDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी : मुसळधार पावसामुळे यंदा बोरी, शिरशिरे व राज्‍यातील अन्‍य भागांतील सुपारी उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. तब्बल ८० टक्के सुपारी पिकाचे नुकसान झाल्याने बागायतदार हतबल झाले आहेत. सुपारी उत्पादकांनी शासनाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

शिरशिरे येथील सुपारी उत्पादक जितेंद्र भट यांनी सांगितले की, आमच्या बागायतीतील तब्बल ९० टक्के सुपारी पिकायच्या आधीच गळून पडली. दोनवेळा औषध फवारणी केली, पण काहीही उपयोग झाला नाही. जमिनीवर पडलेली सुपारी कुजून गेल्याने आता बाजारात त्‍यास किंमत मिळणार नाही.

बोरी व आसपासच्या भागात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे सुपारी झाडांवरील पोफळी मोठ्या प्रमाणावर गळून पडली. परिपक्व न झालेली ही सुपारी कुजून गेल्याने ती बाजारात विक्रीस अयोग्य ठरली. बागायतींचा हिरवा संसार आता उजाडला गेला आहे.

संसारावर झालाय विपरीत परिणाम

सुपारी पिकाचे नुकसान हे फक्त बागायतदारांचे आर्थिक नुकसान नसून त्यांच्या संसारावर परिणाम होणार आहे. बागायतीवरच गुजराण करणाऱ्या उत्‍पादकांना या आपत्तीने कोलमडून टाकले आहे. पावसात झाडांना खणणी, औषधे, कामगार यावर खर्च केला. पण सगळे कष्ट वाया गेले. आता शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जितेंद्र भट यांनी केली आहे.

Crop Damage Goa
Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

बागायतदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार...

  • सुपारी पिकाचे ८० ते ९० टक्के नुकसान

  • औषध फवारणी करूनही नाही फायदा

  • जमिनीवर पडलेली सुपारी गेली कुजून

  • आता बाजारात मिळणार नाही किंमत

Crop Damage Goa
Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

बागायतदारांच्‍या मागण्‍या

  • शासनाने तत्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी

  • नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी

  • बागायतदारांच्‍या संसाराला आधार मिळावा

  • नैसर्गिक आपत्तीसाठी भरपाई देण्याची योजना स्पष्ट असावी

तब्बल ९० टक्के सुपारी पिकायच्या आधीच गळून पडली. दोनवेळा औषध फवारणी केली, पण काहीही उपयोग झाला नाही. जमिनीवर पडलेली सुपारी कुजून गेल्याने आता बाजारात त्‍यास किंमत मिळणार नाही.

- जितेंद्र भट, सुपारी उत्पादक (शिरशिरे-बोरी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com