
पणजी: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी गोव्याच्या काही भागांत पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा वेधशाळेने राज्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत केवळ २.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पावसाची सरासरी आकडेवारी किंचित वाढली असली, तरी एकूण पर्जन्यमानात फारसा फरक पडलेला नाही.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम पुढील काही दिवसांत राज्यातील वातावरणावर दिसू शकतो. त्यामुळे अधूनमधून सरी बरसण्याची शक्यता कायम आहे.
दरम्यान, यलो अलर्ट जारी झाल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः खालच्या भागात राहणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती उपाययोजना कराव्यात, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील किनारी भागांतही आकाश ढगाळ राहून, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांनी प्रवास करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.