Grah Gochar March 2026 Dainik Gomantak
Horoscope

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Grah Gochar March 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे होणारे संक्रमण हे मानवी जीवनावर खोलवर परिणाम करत असते. मार्च २०२६ चा महिना या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Sameer Amunekar

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे होणारे संक्रमण हे मानवी जीवनावर खोलवर परिणाम करत असते. मार्च २०२६ चा महिना या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या महिन्यात दोन महत्त्वाचे ग्रह म्हणजेच सूर्य आणि शुक्र आपले स्थान बदलणार आहेत. या बदलांमुळे काही भाग्यवान राशींच्या आयुष्यात धनलाभ, करिअरमधील प्रगती आणि प्रेमसंबंधांत गोडवा येण्याचे संकेत मिळत आहेत.

ग्रहांची स्थिती आणि बदल

द्रिक पंचांगानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य १५ मार्च २०२६ रोजी रात्री १:०८ वाजता 'मीन' राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर, सौंदर्य आणि सुखाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ५:१३ वाजता 'मेष' राशीत गोचर करेल. ग्रहांची ही स्थिती अनेक राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे.

कोणाचे नशिब चमकणार?

या गोचरचा सकारात्मक प्रभाव प्रामुख्याने मेष, वृषभ, मिथुन, धनु आणि कुंभ राशींवर दिसून येणार आहे:

  • मेष: या राशीच्या जातकांसाठी शुक्राचा प्रवेश अत्यंत लाभदायक ठरेल. त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.

  • वृषभ: नोकरी आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल.

  • मिथुन: करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची चिन्हे आहेत. मान-सन्मानात वाढ होईल आणि सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.

  • धनु: कौटुंबिक जीवनात आनंद नांदेल. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आर्थिक चिंता मिटतील.

  • कुंभ: आयुष्यात नवीन सुवर्णसंधी चालून येतील. कार्यक्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत कराल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT