Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Mandrem Police Investigation : हरमल येथील एका लग्नसोहळ्यात भर दुपारी घडलेल्या धाडसी चोरीप्रकरणाचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
Mandrem Police Investigation
Harmal Wedding TheftDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: हरमल येथील एका लग्नसोहळ्यात भर दुपारी घडलेल्या धाडसी चोरीप्रकरणाचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. या प्रकरणात तपासमोहीम अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त होत असून मांद्रे पोलिस आरोपींना निश्चित पकडतील, असा विश्वास कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या चोरीत परप्रांतीय युवकांचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांनी रेंटवर घेतलेल्या दुचाकीचा वापर करून चोरी केल्याचे समोर आले आहे. संबंधित दोघे युवक लग्नमंडपात चोरीच्या उद्देशानेच आले होते.

Mandrem Police Investigation
Goa Cyber Crime: सावधान गोमंतकीयांनो! तीन महिन्यांत 1030 जण सायबर भामट्यांच्या जाळ्यात; मार्चपर्यंत तब्बल 25 कोटींचा गंडा

घटनेदरम्यान, एका युवकाने वीजमीटरजवळ थांबून काही काळ वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर पुन्हा वीज सुरू करून पुन्हा खंडित करत गोंधळ निर्माण केला. याच संधीचा फायदा घेत दुसऱ्या युवकाने स्टेजवरील पडद्याखालून खुर्चीवर ठेवलेली बॅग उचलली. त्यानंतर दुसऱ्या खोलीचे दार उघडून लोखंडी जिन्यावरून धावत पळ काढला. दोनदा पडूनही तो उठला आणि कुंपणावरून उडी मारून दुचाकीवरून पसार झाला, अशी माहिती स्वयंपाकी मंडळींनी दिली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मांद्रे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अलीकडे कारवाईत ढिलाई होत असल्याच्या तक्रारी असताना, या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ही घटना राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी आव्हानात्मक ठरत असून पोलिस खात्याची प्रतिमा राखण्यासाठी या प्रकरणाचा जलद उलगडा करणे आवश्यक आहे. पेडणे उपअधीक्षक मडकयकर व मांद्रे पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्यासमोर ही मोठी कसोटी असून त्यांनी कर्तव्यदक्षतेने तपास पूर्ण करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Mandrem Police Investigation
Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

धागेदोरे पोलिसांकडे!

पोलिसांच्या हाती संशयितांचे फोटो, स्कूटर तसेच इतर महत्त्वाचे धागेदोरे लागले असल्याचे समजते. त्यामुळे मोपा विमानतळ, रेल्वे स्थानक, बसस्थानके तसेच प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपींना पकडण्याची गरज व्यक्त केली जात आहे. संबंधित स्कूटरचा शोध लागेपर्यंत आरोपी (accused) बेफिकीर राहण्याची शक्यता असून त्यांना पकडणे सोपे जाईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com