

वाळपई: सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक नद्यांवर उन्हाळी हंगामात स्थानिकांसह बाहेरील तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि नागरिक आंघोळीसाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी मद्यसेवन, निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या अभावामुळे दरवर्षी बुडून मृत्यूच्या घटना घडत असून स्थिती चिंताजनक बनली आहे.
अनेकजण केवळ आंघोळीसाठी येत असले तरी काही लोक नदीकिनारी मद्यसेवन करून नशेच्या धुंदीत पाण्यात उतरतात. त्यामुळे धोका अधिक वाढतो. नदीतील पाण्याची खोली, प्रवाहाचा वेग किंवा तळाचा अंदाज नसल्याने बाहेरून येणारे नागरिक अनेकदा संकटात सापडतात. गत एप्रिल महिन्यात भिरोंडा येथील म्हादई नदीत एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला होता. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. भिरोंडा, उस्ते आणि इतर भागांत तर बाटल्यांचा खच दिसून येतो.
मद्यसेवन करून नदीत उतरणे
पाण्याच्या खोलीचा अंदाज नसणे
सुरक्षा यंत्रणेचा अभाव
पर्यटकांची वाढती बेफिकिरी
धोकादायक ठिकाणी बंदी आदेश
सूचना फलक, जीवरक्षकांची नियुक्ती
मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई
स्थानिक स्वराज्य संस्थांची देखरेख
नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना आपला जीव धोक्यात घालू नका. सुरक्षितता आणि शिस्त हीच खरी खबरदारी आहे. -रघू गावकर, सावर्डे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.