Gajakesari Rajyoga 2026 Dainik Gomantak
Horoscope

Gajakesari Rajyoga 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायातून कोट्यवधींचा नफा कमावण्याची संधी! 'गजकेसरी राजयोग' ठरणार वरदान; 5 राशींची आर्थिक चिंता मिटणार

Gajakesari Rajyoga Moon Transit: आज म्हणजेच 18 मे रोजी रात्री 10 वाजून 4 मिनिटांनी चंद्राचे मिथुन राशीत भ्रमण होणार आहे.

Manish Jadhav

Gajakesari Rajyoga Moon Transit: आज म्हणजेच 18 मे रोजी रात्री 10 वाजून 4 मिनिटांनी चंद्राचे मिथुन राशीत भ्रमण होणार आहे. विशेष म्हणजे मिथुन राशीत आधीपासूनच देवगुरु बृहस्पती (गुरु) विराजमान आहेत, ज्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीने अत्यंत शुभ मानला जाणारा 'गजकेसरी राजयोग' निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राजयोगाची निर्मिती विशिष्ट 5 राशींच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली आणि प्रगतीकारक ठरणार आहे.

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा गजकेसरी राजयोग कमालीचा शुभ ठरेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि आर्थिक समृद्धी लाभेल. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला नफा मिळवून देईल. तसेच विवाहित जोडप्यांसाठी हा काळ सुखाचा आणि नाते अधिक मजबूत करणारा असेल.

सिंह राशीच्या जातकांवरही या राजयोगाचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. तुम्हाला विविध मार्गांनी धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक नोकरीमध्ये बऱ्याच काळापासून पदोन्नतीच्या (Promotion) प्रतीक्षेत आहेत, त्यांना या काळात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कौतुक होईल, तसेच व्यवसायाच्या किंवा कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग रखडलेली कामे मार्गी लावणारा असेल. बऱ्याच काळापासून अडकून पडलेली कामे आता यशस्वीपणे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून अभ्यासात प्रगती होईल. आर्थिक आघाड्यांवरही तुमची स्थिती मजबूत राहील.

कुंभ राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये या काळात मोठी वाढ (ग्रोथ) पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची चिन्हे आहेत, तर व्यापाऱ्यांना व्यवसायात मोठा नफा कमावता येईल. अचानक होणाऱ्या धनलाभामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आर्थिक चणचण दूर होईल.

मीन राशीच्या लोकांच्या जीवनातही गजकेसरी राजयोग आनंदाची नवी लाट घेऊन येणार आहे. पैशांअभावी रखडलेल्या तुमच्या सर्व समस्या आता सुटतील. कोणाकडे तरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात तुम्हाला परत मिळू शकतात. यासोबतच नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याचे मजबूत योग निर्माण होत आहेत. एकूणच या 5 राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा सिद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT