lunar eclipse Dainik Gomantak
Horoscope

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Lunar Eclipse 2025 Astrology: चंद्रग्रहण काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरेल, तर काही राशींना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे

Akshata Chhatre

Chandragrahan effects on 12 rashis: ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेला कुंभ राशी आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात पूर्ण चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होऊन मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांनी संपणार आहे. रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण आपल्या परमोच्च शिखरावर असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही पूर्ण चंद्रग्रहणाचा प्रभाव सहा महिन्यांपर्यंत राहतो, त्यामुळे या ग्रहणाचे परिणाम जीवनाच्या विविध क्षेत्रांवर दिसून येतील.

ज्योतिषांच्या मतानुसार, हे चंद्रग्रहण काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरेल, तर काही राशींना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहणाचा परिणाम आणि त्यानुसार करावयाचे उपाय खालीलप्रमाणे:

या राशींना होईल फायदा:

  • मेष: मेष राशीच्या व्यक्तींचे अडकलेले काम पूर्ण होतील. वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणातून सुटका होईल. शत्रू आणि विरोधकांवर विजय मिळेल. ग्रहणानंतर पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होईल.

  • वृषभ: जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. करिअरमध्ये लाभदायक बदल होतील. धन आणि संपत्तीशी संबंधित समस्या दूर होतील. ग्रहणानंतर पांढऱ्या मिठाईचे दान केल्यास मोठा फायदा होईल.

  • कन्या: आरोग्य सुधारेल आणि जुने आजार दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. शत्रूंवर मात कराल. ग्रहण संपल्यावर पांढऱ्या मिठाईचे दान करणे शुभ राहील.

  • धनु: करिअरमध्ये मोठे यश मिळेल. नोकरीत बदल किंवा मनासारखी बदली मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. ग्रहणानंतर दुधाचे दान केल्यास लाभ होईल.

या राशींनी काळजी घ्यावी:

  • मिथुन: या राशीच्या व्यक्तींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील वाद आणि करिअरमधील नुकसान टाळण्यासाठी सावध राहा. प्रवासात विशेष काळजी घ्या. ग्रहणानंतर दुधाचे दान केल्यास अडचणी कमी होतील.

  • कर्क: कर्क राशीसाठी हे ग्रहण नकारात्मक सिद्ध होऊ शकते. शिक्षण आणि करिअरमध्ये अधिक मेहनत करावी लागेल. आरोग्य आणि स्थान बदलाबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्या. ग्रहणकाळात शिव मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरेल.

  • सिंह: व्यवसाय आणि नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात. वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या. सध्या कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा आणि नवीन काम सुरू करू नका. ग्रहण संपल्यावर तांदळाचे दान करा.

  • तुळ: करिअरमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय जपून घ्या. लिखापढीच्या कामात सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधात अपयश येऊ शकते. ग्रहणानंतर तांदळाचे दान करा.

  • वृश्चिक: कौटुंबिक आणि डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. धनहानी होण्याची शक्यता आहे. प्रवासात विशेष खबरदारी घ्या. ग्रहणकाळात शिव मंत्राचा जप करणे लाभदायक ठरेल.

  • मकर: आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात. करिअरमध्ये निष्काळजीपणा टाळा. ग्रहणानंतर पांढऱ्या वस्तूचे दान करा.

  • कुंभ: हे ग्रहण तुमच्याच राशीत होत असल्याने विशेष काळजी घ्या. पालक आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. करिअरमध्ये कोणताही धोका पत्करू नका. नातेसंबंधांमध्ये समस्या येऊ शकतात. ग्रहणानंतर तांदळाचे दान करणे शुभ राहील.

  • मीन: मानसिक आणि शारीरिक आरोग्याची समस्या येऊ शकते. कौटुंबिक जीवनाकडे लक्ष द्या. वाहन चालवताना आणि प्रवासात सावध राहा. ग्रहणकाळात शिव मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT