Ashadhi Ekadashi Mahayog: हिंदू धर्मशास्त्रानुसार, वर्षातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या एकादशींपैकी एक म्हणजे आषाढी एकादशी. देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखला जाणारा हा दिवस वारकऱ्यांसाठी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा आणि भक्तीरसात न्हाऊन निघण्याचा एक अनमोल क्षण असतो. यंदा ६ जुलै २०२५ रोजी साजरी होणारी आषाढी एकादशी विशेष फलदायी ठरत आहे, कारण या दिवशी एका नाही तर तब्बल पाच शुभ योग जुळून आलाय. या योगंच्या प्रभावामुळे काही राशींच्या व्यक्तींना मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ६ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ असणार आहे. या दिवशी मिथुन राशीत सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे आदित्य योग जुळून येणार आहे, जो एक अत्यंत प्रभावी राजयोग मानला जातो. या व्यतिरिक्त, मालव्य राजयोग, शुभ योग, साध्य योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योग असे इतर शुभ योगही एकाच दिवशी येत आहेत. या पंचमहायोगंचा एकत्रित प्रभाव अनेक राशींसाठी भाग्योदय घडवणारा ठरेल.
१. वृषभ रास :
आषाढी एकादशीचे शुभ योग वृषभ राशीच्या लोकांसाठी मानसिक शांती घेऊन येतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. रखडलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात तुम्ही वाहन किंवा मौल्यवान दागिने खरेदी करण्याचा विचार करू शकता. एकूणच, हा काळ आर्थिक आणि मानसिक स्तरावर समाधान देणारा ठरेल.
२. कर्क रास:
कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात आर्थिक आघाडीवर मोठी सुधारणा दिसून येईल. भौतिक सुखांचा उपभोग घेण्याची संधी मिळेल. नोकरदार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग आहेत, ज्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिक लोकांसाठी व्यवसायाच्या विस्तारासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे, ज्यामुळे नफ्यात वाढ होईल.
३. सिंह रास:
सिंह राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ फलदायी सिद्ध होईल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि तुम्हाला मनासारखे काम करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे आर्थिक चिंता कमी होतील.
४. कन्या रास:
कन्या राशीच्या लोकांसाठी व्यवसायात लक्षणीय प्रगती दिसून येईल. नोकरदार वर्गातील व्यक्तींना कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. तुमचे आर्थिक जीवन सुरळीत चालेल आणि गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.