Astrology in Marathi: रवी, मंगळ एकाच वेळी निर्बल; याचा तुमच्यावर काय परिणाम होणार?

Astrology Predictions: जाणून घ्या ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यातील राशीफळ
Astrology Predictions: जाणून घ्या ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यातील राशीफळ
Astrology Oct-Nov 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

ज्योतिषाचार्य सारंग चिक्षे

स्वयंप्रकाशी रवी ग्रह हा विशेष करून आरोग्याचा तसेच निसर्गाचे प्रतीक आहे. बलवान मंगळ ग्रह हा धाडस तथा प्रतिकार शक्ती प्रदान करणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. वर्ष २०२४ मधल्या ऑक्टोबर महिन्यात २१/१०/२४ नंतर हे दोन्ही ग्रह निर्बल अवस्थेत आले आहेत. याचा अर्थ असा की रवी तुळ राशीत व मंगळाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. हे दोन्ही ग्रह सध्या नीच राशीत आलेत आणि या ग्रहस्थितींचा परिणाम पुढील प्रमाणे दिसेल.

आरोग्याची प्रतिकार शक्ति कमी होईल, अधिक कार्ये न करता देखील भरपूर थकवा जाणवेल, प्रचंड आळस निर्माण होईल, विशेष करून बाहेरील पदार्थांचे सेवन केल्याने तथा दूषित पाण्याने नैसर्गिक आजार होण्याची संभावना दिसते. राजकरणात कार्य करणाऱ्यांना यश मिळणार नाही, अपेक्षित मते मिळणार नाहीत अर्थात राजकारण पडेल.

कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य नियमितपणे पार पडण्यात काहीशा अडचणी येतील. शक्यतो दूरचे प्रवास टाळावेत आणि काही अपरिहार्य कारणास्तव प्रवास करावा लागत असल्यास तो प्रवास लक्षपुर्वक करावा.

या दिवसांत प्रचंड अपघात होतील, प्रेमप्रकरणातून झालेले विवाहित लोकांचे घटस्पोट अधिक प्रमाणात होतील. खेळाडूंची अवस्था गंभीर असेल, जिथे ताकदीची आवश्यकता पडते अशी कार्ये यशस्वीपणे पार पडणार नाहीत काही ना काही विघ्ने येतील.

व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी चिडचिड होणे, मनाप्रमाणे कार्य न होणे, मानसिक स्थिती बिघडणे, निर्णय क्षमता कमी होणे अशा घटना घडतील. काही ठिकाणी अनपेक्षित पाऊस पडून धान्याची नासाडी होईल, कॉम्पुटर, कला क्षेत्रातील लोकांना फायदा मिळणार नाही.

- मेष, तुळ, मकर, धनु, कर्क या राशींच्या लग्न कुंडलीत हे ग्रह अशुभ स्थितीत असतील तर वरील फळ कमी जास्त प्रमाणात मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com