5 May 2026 Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: मोठा मंगळ अन् संकष्टीचा वरदान! बाप्पाच्या कृपेने 'या' राशींचे टेन्शन कायमचे मिटणार, रखडलेली कामे पूर्ण होणार

5 May 2026 Horoscope: आज ज्येष्ठ कृष्ण पक्षाची चतुर्थी असून, संपूर्ण दिवस शिव योगाचा प्रभाव राहणार आहे. तसेच, आज दुपारी १२:५५ पर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आणि त्यानंतर मूळ नक्षत्र सक्रिय होईल.

Sameer Amunekar

आज ज्येष्ठ कृष्ण पक्षाची चतुर्थी असून, संपूर्ण दिवस शिव योगाचा प्रभाव राहणार आहे. तसेच, आज दुपारी १२:५५ पर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आणि त्यानंतर मूळ नक्षत्र सक्रिय होईल. संकष्टी गणेश चतुर्थी आणि ज्येष्ठ महिन्यातील पहिला 'बड़ा मंगल' असल्याने मारुतीरायाची आणि गणपतीची विशेष कृपा भाविकांवर राहणार आहे.

नोकरी आणि व्यवसायात प्रगती मेष आणि मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीकारक ठरेल. मेष राशीच्या जातकांना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे, तर मिथुन राशीच्या लोकांना जुने उधार दिलेले पैसे अचानक परत मिळतील. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पदोन्नतीचे (Promotion) संकेत आहेत. सिंह आणि धनु राशीच्या व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफ्याचा असेल; विशेषतः प्लास्टिक व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी आणि करिअर विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रता वाढवणारा आहे. वृषभ आणि तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ज्या तरुण-तरुणींना नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना कन्या आणि वृश्चिक राशीच्या मित्रांच्या मदतीने नामांकित कंपनीत कामाची संधी मिळू शकते. तूळ राशीच्या पालकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, त्यांच्या मुलांची सरकारी नोकरीसाठी निवड होण्याची शक्यता आहे.

कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कर्क आणि सिंह राशीच्या कुटुंबात आज आनंदाचे वातावरण राहील. घरात नवीन पाहुण्याचे आगमन होण्याचे संकेत आहेत. मकर आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी वैवाहिक जीवन मधुर राहील. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत आखले जातील. वडिलांच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कुंभ राशीच्या व्यक्तींना आज मोठी मदत मिळेल.

आरोग्य आणि सावधानता धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या खानपानाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मीन राशीच्या लोकांनी नवीन व्यवसाय सुरू करताना तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास नुकसान टाळता येईल. मकर राशीच्या लोकांसाठी आरोग्य सुधारेल आणि जुन्या व्याधींपासून आराम मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

Under 23 Cricket: पहिल्या डावात आघाडी, तरीही गोव्याचा पराभव; ओडिशाने 125 धावांनी दिला धक्का

SCROLL FOR NEXT