Assolda man found dead Dainik Gomantak
गोवा

आत्महत्या की हत्या? 24 तास बेपत्ता, झुआरी पुलाजवळ आढळलेला मृतदेह, असोल्डातील व्यक्तीच्या मृत्यूने वाढले गूढ

Zuari bridge death case: गेल्या चोवीस तासांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सोमवार झुआरी पुलाजवळ सापडल्याने एकच खळबळ उडाली

Akshata Chhatre

झुआरी: गेल्या चोवीस तासांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सोमवार (दि.१५) रोजी झुआरी पुलाजवळ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुशील प्रभुदेसाई (वय ४६, रा. असोल्डा, केपे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील प्रभुदेसाई यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी (दि. १४) केपे पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत होते. यानंतर सोमवारी सकाळी, झुआरी पुलाजवळ एक मृतदेह तरंगताना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्वरित घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, तो बेपत्ता असलेल्या सुशील प्रभुदेसाई यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT