Zuari Bridge Accident  Dainik Gomantak
गोवा

गाडीने जाणे टाळल्याने हेल्टन बचावला!

दैव बलवत्तर : ‘ते’ चौघे पणजीकडे बर्थ डे पार्टीसाठी जात होते असल्याची जबानी

दैनिक गोमन्तक

पणजी : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या वाक्याचा प्रत्यय नुकताच आला. झुआरी पुलावरील दुर्घटनेत चौघांना जलसमाधी मिळाली. मात्र, त्यांच्यासोबत गाडीने न गेल्याने लोटली येथील हेल्टन फर्नांडिस हा त्याचे दैव बलवत्तर म्हणून बचावला. अपघात होण्यापूर्वी चौघेही घरी बर्थ डे पार्टी केल्यानंतर ते पणजीत पार्टी करण्यासाठी जात होते व त्याला बोलावत होते. मात्र हेल्टन यांनी नकार दिला अशी माहिती पोलिसांनी त्याची नोंद केलेल्या जबानीत उघड झाली आहे.

लोटली येथे बुधवारी मध्यरात्री प्रिसिल मेरी तावारिस डिक्रुझ हिच्या घरी तिचा पती अँथनी हेन्री आरावजो याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस रात्री साजरा करण्यात आला तेव्हा हेल्टन फर्नांडिस यांच्यासह ऑल्विन हार्ले आरावजो व ऑस्टिन कॅल्विन फर्नांडिस हे उपस्थित होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर पणजीत पार्टी करण्यासाठी जाण्यास हे चौघे निघाले. त्यांनी हेल्टन फर्नांडिस यालाही गाडीतून येण्यास आग्रह करत होते. मात्र, हेल्टन यांना सकाळी काही महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी नकार दिला. रात्री 12 वाजल्यानंतर प्रिसिला डिक्रुझ हिच्या मालकिची गाडी घेऊन ते चौघेजण पणजीच्या दिशेने जाण्यास निघाले. त्यावेळी गाडी प्रिसिलाचा पती अँथनी आरावजो चालकाच्या सीटवर बसला होता तर त्याच्या बाजूला प्रिसिला होती. ऑल्विन आरावजो व ऑस्टीन फर्नांडिस हे गाडीच्या मागील सीटवर बसलेले होते. ते सर्वजण गाडीने लोटली येथून पणजीला जाण्यास निघाल्यानंतर हेल्टन फर्नांडिस हाही आपल्या घरी निघून गेला.

अँथनी आरावजो याचा वाढदिवस असल्याने पणजीतील एखाद्या हॉटेलमध्ये पार्टी करण्याचे या सर्वांनी ठरविले होते. हेल्टन यांनाही जोडीला घेऊन जाणार होते. मात्र, तो गेले नाही. त्यांनी जाण्यास दिलेला नकार त्यांचा जीव वाचण्यास महत्वाचा ठरला. दरम्यान, या दुर्घटनेच्या वृत्ताने हेल्टन फर्नांडिस पूर्णपणे कोलमडले आहेत. त्यांचे जवळचे मित्र काही मिनिटातच त्याच्यापासून दूर गेल्याचे दुःख ते अजूनही पचवू शकलेले नाही.

सोशल मीडियावरून समजली माहिती
त्या रात्री दोननंतर झुआरी पुलावरून डस्टर गाडी पाण्यात पडल्याची माहिती व्हिडिओवरून व्हायरल झाली होती. लोटलीत असलेल्या हेल्टन फर्नांडिस यांना ही गोष्ट समजताच त्यांनी त्या चौघांच्याही मोबाईलवर फोन केला. पण संपर्क होत नसल्याने त्याने प्रिसिला यांच्या घरी गेला. ते घरी न दिसल्याने हेल्टन यांनी झुआरी पुलावर धाव घेतली. पुलाचा कठडा मोडलेला होता व गाडीचा रंग काळा होता तो प्रिसिला यांच्या गाडीशी मिळताजुळता असल्याने त्यांचा संशय वाढला.

अहवालानंतर मद्याबाबत समजणार
आगशी पोलिसांनी अपघातातील मृतदेह त्यांचा नातेवाईकांकडे सुपूर्द केले आहेत. प्रिसिला यांचा मृतदेह गुरुवारी तर इतर तिघांचा काल देण्यात आला. शवचिकित्सा करताना त्या सर्वांचा ‘व्हिसेरा’ नमुना काढण्यात आला आहे. तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लेबॉरेटरीकडे पाठविला जाणार आहे. तपासणी अहवाल हाती आल्यानंतरच मद्य त्यांनी घेतले होते की नाही याची माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

SCROLL FOR NEXT