झुआरी अपघातामागे हलगर्जीपणा की बेसावधपणा?

या अपघातामागील लोकांनी उपस्थित केलेले प्रश्‍न व त्यावर होत असलेली चर्चा हे हलगर्जीपणा व बेसावधपणा त्यातून पुढे येत आहे.
Zuari Bridge Accident
Zuari Bridge Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : झुआरी पुलावरून नदीत कोसळून झालेल्या गाडीच्या अपघातप्रकरणी लोकांमध्ये तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या अपघातामागील लोकांनी उपस्थित केलेले प्रश्‍न व त्यावर होत असलेली चर्चा हे हलगर्जीपणा व बेसावधपणा त्यातून पुढे येत आहे. या अपघातामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

गाडी कोण चालवित होते?

ही गाडी दुपारी 12.30 च्या सुमारास नदीतून बाहेर काढण्यात आली, तेव्हा आतमध्ये सीटवर बसलेल्या ठिकाणीच मृतदेह होते. चालकाच्या सीटवर प्रिसिला तावारिस डिक्रुझ होती. त्यामुळे ती गाडी चालवत असल्याचे सिद्ध झाले.

गाडीतील सर्वांनी मद्य घेतलेले होते ?

मृत्यू झालेले चौघेही मित्राच्या ‘बर्थ डे पार्टी’ला गेले होते. या पार्टीमध्ये मद्याचा समावेश होता.त्यामुळे या सर्वांनी मद्य घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रिसिलाने मद्य कमी किंवा न घेतल्याने तिने गाडी चालवली असावी.

पुलावर गा़डीची गती किती?

झुआरी पुलाच्या कठड्याला जोरदार धडकी दिली व रस्त्यावर ब्रेक मारल्याच्या खुणा होत्या. यावरून ही गाडी 120 किलोमीटर वेगापेक्षा अधिक वेगात असताना ओव्हरटेक करत होती. पुलावर वाहन वेगमर्यादा असते, त्याचे पालन न केल्याचे या भीषण अपघाताच्या तीव्रतेवरून उघड होते.

या अपघातामागील कारणे कोणती?

पुलावर वेगमर्यादा असते, तसेच ओव्हरटेक करण्यास बंदी आहे. तरीही त्याचे पालन न केल्याने हा अपघात घडला असावा. पुलावर ओव्हरटेक करताना ब्रेक मारण्याऐवजी एक्सलेटर दाबला गेला असावा आणि नियंत्रण गेल्याने ती कठडा मोडून पाण्यात गेली असण्याची शक्यता अधिक आहे.

रात्रीच्यावेळी वाहने वेगमर्यादेपेक्षा अधिक गतीने चालवितात?

रस्त्यावर रात्रीच्यावेळी वाहनांची वर्दळ कमी असते व रस्ता मोकळा असतो. त्याचा फायदा उठवण्यासाठी वाहन चालक भरधाव वेगाने गाडी चालवतात. प्रिसिला डिक्रुझ हिने सुद्धा रस्ता मोकळा असल्याने व वाहने कमी असल्याने पुलावर भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा मोह आवरला नाही.

त्या गाडीतील बुडणाऱ्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला का?

अपघाग्रस्त गाडी नदीत पडल्यानंतर ती तळाला गेली. त्यावेळी आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर येण्यासाठी गाडीच्या काचा फोडण्याची संधीच मिळाली नसावी. गाडीची दारे उघडून बाहेर जरी पडले असते, तरी त्यांना पोहून जीव वाचवता आला नसता. घटना रात्रीची असल्याने ते गाडीतच अडकून राहिले.

Zuari Bridge Accident
Goa Accident : कार नाल्यात कोसळून भीषण अपघात; चौघांना वाचवलं

रात्री अशी दुर्घटना घडली तर काय यंत्रणा आहे?

खोल नदीच्या पात्रात वाहन बुडल्यास व घटना रात्रीची घडल्यास सरकारकडे बचावकार्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. शोध व बचाव कार्यासाठी तटरक्षक किंवा नौदल डायव्हर्सवर अवलंबून राहण्याची पाळी अनेक वेळा येते. सरकारकडे स्वतःची अशी आपत्कालीन यंत्रणा नाही. त्यामुळे अशा दुर्घटनांसंदर्भात शोध व बचावकार्यासाठी सरकारने अत्याधुनिक सुविधा तयार असणेे आवश्यक आहे.

अपघाताचे कारण चालकाला डुलकी लागणे असू शकते?

मध्यरात्रीच्या सुमारास चालकाला गाडी चालवताना डुलकी येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे वाहनाच्या चालकाच्या बाजूला असलेली व्यक्ती ही जागी असणे महत्त्वाचे आहे. त्या व्यक्तीने चालकाला जागे ठेवण्यासाठी व त्याला डुलकी येऊ नये, यासाठी त्याच्याशी बोलत राहून व्यस्त ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. या अपघातावेळी चालकाला डुलकी लागून हा अपघात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

अपघातग्रस्त गाडी महिलाच का चालवत होती?

गाडीतील सर्वजण हे ‘बर्थ डे’ पार्टीला गेले होते. त्यामुळे या पार्टीत सर्वांनीच मद्य घेतले असावे. पार्टी म्हटली की मद्य हे आलेच. महिलेने या पार्टीत मद्य कमी घेतले असावे, म्हणून तिने वाहन चालविले असावे. गाडीही तिच्याच मालकीची असल्याने ती स्वतःच चालवत असावी.

गाडीमधील सर्वांनी ‘सीट बेल्ट’ लावले होते का?

प्रत्येक वाहन चालकाने गाडी चालवताना नियमानुसार सीट बेल्ट लावणे सक्तीचे आहे. तसेच सहचालक व गाडीत मागे बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट लावण्याची सोय असते. या वाहनात असलेल्या एकाच्या शरीरावर रक्ताचे डाग होते, त्यामुळे ही गाडी नदीत पडण्यापूर्वी उसळल्याने त्याचा फटका उजव्या बाजूने मागे बसलेल्या व्यक्तीला बसला असावा किंवा ती व्यक्ती जोरदारपणे वाहनाला आतून आदळली असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com