Zilla Panchayat Election
Zilla Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat Election: दवर्लीतून अपक्षाची माघार; एकूण 15 उमेदवार रिंगणात

दैनिक गोमन्तक

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीच्या तीन जागांवरील पोटनिवडणुकीसाठी शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दवर्ली जिल्हा पंचायत मतदारसंघातील अपक्ष पूजा प्रमोद नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे दवर्लीच्या रिंगणात 7 उमेदवार राहिले असून येथे सप्तरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

रेईश मागूस मतदारसंघात भाजपने संदीप बांदोडकर यांना, तर काँग्रेसने प्रगती पेडणेकर यांना उमेदवारी दिली आहे. येथे ‘आप’ने अपक्ष उमेदवार राजेश दाभोळकर यांना पाठिंबा दिला आहे, तर साईनाथ कोरगावकर यांची अपक्ष उमेदवारी चौरंगी लढतीत कितपत चुरस वाढवणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

दवर्लीत सात उमेदवार असल्याने भाजपच्या परेश नाईक यांना ते किती फायदेशीर ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. काँग्रेस व ‘आप’ने याठिकाणी आपला उमेदवार उभा केला आहे. कुठ्ठाळीत भाजपने अपक्षाला पाठिंबा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT