Zambaulim temple election Dainik Gomantak
गोवा

Zambaulim: कुणाचे पॅनेल निवडून येणार? जांबावली देवस्थानचा निकाल न्यायालयाच्या आदेशानुसार राखीव

Zambaulim temple election: न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मते तीन वेगवेगळ्या मतपेट्यांमध्ये सील करून ठेवल्याने या निवडणुकीचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

मडगाव: मतदानाचा वाद मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी आज मतदान झाले खरे; मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मते तीन वेगवेगळ्या मतपेट्यांमध्ये सील करून ठेवल्याने या निवडणुकीचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे या मंदिरावर कुणाचे पॅनल निवडून येणार, याचे गूढ कायम राहिले आहे.

दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानच्या अध्यक्षपदी विनोद देसाई यांची तर शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवस्थान अध्यक्षपदी संकेत फळदेसाई यांची बिनविरोध निवड झाली. नागेशी बांदिवडे येथील श्री नागेश महारूद्र देवस्थानचे अध्यक्ष म्हणून संजय प्रियोळकर यांची बिनविरोध निवड झाली.

मतदान वेळेबाबत संभ्रम

सुरवातीला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदान होईल, असे जाहीर केल्याने काही वेळ वातावरण तापले. मात्र, देवस्थानचे महाजन सिद्धनाथ बुयांव यांनी इतर ठिकाणी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान खुले असल्याचे मामलेदार प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रभू यांनी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील, असे सांगितल्यावर वातावरण निवळले.

अन् बाळ्ळीत बिनविरोध निवड

बाळ्ळी येथील श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवस्थानच्या निवडणुकीचा वादही केपे मामलेदार कार्यालयात पोहोचल्याने ही निवडणूक वादग्रस्त होईल, असे वाटत होते. मात्र, त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थान अध्यक्षपदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भावोजी विदेश देसाई यांचे भाऊ विनोद देसाई हे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT