Temple Elections: गोव्यात 12 मंदिरांच्या निवडणुका रद्द, 58 ठिकाणी बिनविरोध; रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया

Goa Temple Elections: देवस्थानांच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात यासाठी देवस्थानांच्या प्रशासकांना निर्देश जारी करण्यात आले होते.
Goan Temple
Goan Temple ArchitectureMahalaxmi Sansthan
Published on
Updated on

Temple trust elections Goa

पणजी: राज्यभरातील १२ तालुक्यांमध्ये २२० देवस्थानांपैकी ५८ ठिकाणी बिनविरोध तर १२ मंदिरांच्या निवडणुका रद्द झाल्या. तसेच १५० देवस्थानांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू होते. अधिकृत आकडेवारी सरकारकडून उद्या जाहीर करण्यात येईल. साळ आणि मये येथे वाद झाल्याने तेथील निवडणुका स्थगित करण्यात आल्या.

प्रतिष्ठेच्या जांबावली, बोडगेश्‍वर देवस्थानांमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. विठ्ठलापूर - साखळी येथील विठ्ठल मंदिर अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे तर पणजीतील महालक्ष्मी देवस्थान अध्यक्षपदी उद्योजक श्रीनिवास धेंपे यांची बिनविरोध फेरनिवड झाली.

देवस्थानांच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात यासाठी देवस्थानांच्या प्रशासकांना निर्देश जारी करण्यात आले होते. मात्र, रविवारी काही ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला. मोरजी येथील श्री मोरजाई देवस्थानच्या निवडणुकीबाबत आज काही समस्या निर्माण झाल्या.

मये आणि साळ येथील निवडणूक स्थगित

एका गटाने निवडणूक प्रक्रियेला आक्षेप घेतल्याने मयेच्या श्री माया केळबाय देवस्थानांची निवडणूक स्थगित करावी लागली. निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा करून कारबोटकर गटाने निवडणूक घेण्यास हरकत घेतल्याने पुढील निर्णय होईपर्यंत निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला. देवस्थानची निवडणूक स्थगित करण्यात आली असली, सभेवेळी कोणताही वाद झाला नाही. ३२ देवस्थानच्या निवडणुका सुरळीत पार पडल्या. वाद उदभवल्याने साळ आणि मये येथील देवस्थानच्या निवडणुका स्थगित ठेवल्या, तर ३० देवस्थानांच्या समित्यांची बिनविरोध निवड झाली.

तिसवाडीत ९ पैकी ६ देवस्थानांची निवडणूक बिनविरोध : तीन रद्द

तिसवाडीतील ९ पैकी ६ देवस्थानच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर धुळापी - खोर्ली येथील श्री सातेरी रवळनाथ देवस्थानची निवडणूक भाविकांमधील मतभेदांमुळे होऊ शकली नाही, तर मेरशी विठोबा देवस्थान आणि डोंगरी येथील सीता-रामचंद्र देवस्थानच्या निवडणुकीस कोणीही उपस्थित राहिले नाहीत. जुने गोवे येथील श्री गोमंतेश्‍वर मंदिर, दिवाडी येथील श्री शक्तिविनायक, भाटलेतील श्रीराम मंदिर, चोडण येथील श्री वासुदेव देवकीकृष्ण पिसो रवळनाथ संस्थान, पणजीतील श्री महालक्ष्मी संस्थान, कालापूर येथील शांतादुर्गा देवस्थानची निवडणूक झाली.

Goan Temple
Temple Elections: गोव्‍यात मंदिर व्‍यवस्‍थापन समितीच्या निवडणूकांची उत्सुकता! इच्छुकांचे लॉबिंग, 'काही' वाद न्‍यायालयात

गुरव समाजाचा निवडणुकीवर बहिष्कार

वेळूस येथील श्री रवळनाथ देवस्थान समितीची निवडणूक पोलिस व मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली. मात्र, गुरव समाजाने या निवडणुकीवर बहिष्कार घातला.

Goan Temple
Goa Temple Election: देवस्थान समिती निवडणूक; कुठे बहिष्कार, तर कुठे बिनविरोध!!

काणकोण तालुक्यातील ११ पैकी नऊ देवस्थान समित्यांच्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. गावडोंगरी आणि श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवालय समितीसाठी दोन गट रिंगणात होते.

फोंडा तालुक्यातील ४९ पैकी दोन देवालयांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यात मंगेश देवस्थान तर माशेल येथील शांतादुर्गा तळावलीकरीण देवस्थानचा समावेश आहे.

येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थान समितीच्या निवडणुकीत सातव्या फेरीनंतर अध्यक्ष पदासाठी ॲड. वामन पंडित हे आघाडीवर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com