Breast Cancer  Dainik Gomantak
गोवा

Breast Cancer: स्तन कॅन्सरग्रस्त महिलांना युवराज सिंग फाऊंडेशनचा आधार; काणकोणमध्ये शिबिराचे आयोजन

Canacona: डॉ. दीपिका देसाई- शिबिरात 16 महिलांची तपासणी करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Breast Cancer: युवराज सिंग फाऊंडेशन संस्थेतर्फे देशभरातील पीडित स्तन कॅन्सरग्रस्त महिलांना आधार मिळत आहे. मेमोग्राफी चाचणीमुळे या रोगाचे प्राथमिक निदान करून घेणे खेडोपाडी सहज साध्य झाले आहे. देशभरातील अनेक महिलांना या फाऊंडेशनचा आधार वाटतो, असे प्रतिपादन डॉ. दीपिका देसाई यांनी केले.

महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयातर्फे देळे, काणकोण येथील निल नाईक गावकर यांच्या निवासस्थानी आयोजिल्या स्तन चाचणी शिबिरात डॉ. देसाई बोलत होत्या. देळे येथील श्री निराकार मठ स्वयंसहाय्य गटाच्या 16 महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. दिव्या नाईक यांचाही यावेळी सहयोग लाभला.

डॉ. देसाई म्हणाल्या, तत्काळ मेमोग्राफी चाचणी करण्याचे उपकरण या फाऊंडेशनतर्फे पुरवण्यात आल्यामुळे आज खेड्यापाड्यातील स्तन कॅन्सरग्रस्त महिलांनाही चाचणी करून घेणे सहज साध्य झाले आहे. प्रत्येक महिलेने कोणताही विचार न करता ही चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योती पैंगीणकर व मेघना गावकर यांनीही यावेळी महत्त्वपूर्ण माहिती दिली. स्वयंसहाय्य गटाच्या आरती नाईक गावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुढचे 5 दिवस पावसाचे! राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी; तीव्रता वाढण्याची शक्यता

Goa Education: शिक्षणाचा 'विजय'! GECच्या 35 प्राध्यापकांची कामावर वापसी; सरदेसाईंनी करून दाखवले

AFC Champions League: FC Goaची लागणार कसोटी, अल सीबविरुद्ध रंगणार सामना

Ganesh Chaturthi 2025: '40 वर्षांची' परंपरा, 2 महिने गाव सोडून करतात गणेशभक्तांची सेवा; पेडण्यात होते चर्मवाद्यांची दुरुस्‍ती

Goa Live News: 5 दिवस पाऊस राहणार कायम

SCROLL FOR NEXT