Francisco Sardinha : टॅक्सीवाल्यांमुळे गोव्याचं नाव बदनाम, खासदार सार्दिनांनी वाचला समस्यांचा पाढा

राज्यात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचंही फ्रान्सिस सार्दिन यांचं मत
MP Francisco Sardinha
MP Francisco SardinhaDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा विमानतळ लवकरच कार्यान्वित होत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी टॅक्सी व्यवस्था गरजेची आहे. मात्र, टॅक्सीवाले प्रवाशांना भरमसाट भाडे आकारतात. त्यामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. हे टाळण्यासाठी सरकारने किलोमीटरप्रमाणे भाड्याची रक्कम निश्चित करावी, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली आहे. जे टॅक्सीचालक प्रवाशांना लुटतात, त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचेही सार्दिन यांनी सांगितले. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी मडगावात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील समस्यांचा पाढाच वाचला.

गोवा हे देशातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र असल्याने येथे लाखो देशी - विदेशी पर्यटक येतात. सध्या नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. प्रमुख शहरे, पूल व समुद्र किनारी वाहतुकीची कोंडी जाणवते आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणजे गोव्यात जास्तीत जास्त वाहतूक पोलिसांची गरज भासते. मात्र, या दिवसांत रस्त्यांवर वाहतूक पोलिस दिसत नाहीत. वाहतूक पोलिसांनी नव्या वर्षातही हेल्मेट, सीटबेल्ट सक्ती, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करावे, तसेच वाहतूक सुरळीत करण्यावरही भर द्यावा, अशी मागणी सार्दिन यांनी केली.

MP Francisco Sardinha
New Zuari Bridge : झुआरी पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी होणार खुला

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान द्या!

गोव्यातील कृषी क्षेत्र हे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होणे आवश्यक आहे. गोव्यात मजुरांचा दिसवडा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे कृषी खात्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान दिले पाहिजे. ध्वनी प्रदूषणासंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो आहे. विवाह किंवा जत्रा, फेस्त वगैरेच्या ठिकाणी आवाज मर्यादेवर शिथिलता देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रेव्ह, सनबर्न किंवा इतर पार्ट्या गोव्यात होतात, तेथील आवाज कानठळ्या बसविणारा असतो. त्यावर सरकारने निर्बंध आणावेत, अशी मागणीही सार्दिन यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com