MLA Vijay Sardesai despite Yuri alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: ‘दृष्टी’, ‘रोड शो’वरून विरोधकांचा घणाघात; खर्चावरुन प्रश्नचिन्ह

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: जीवरक्षक कंत्राटात घोटाळा झाल्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी दृष्टी जीवरक्षक संस्थेला वारंवार दिली जाणारी मुदतवाढ आणि ‘रोड शो’वर भरमसाट खर्च करूनही हाती काहीच लागले नसल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी घातला.

देशभरातील पर्यटक गोव्यात यावेत यासाठी पर्यटन खात्याने ‘रोड शो’वर तब्बल २९ कोटी ८४ लाख रुपये खर्च केले. असे असतानाही पूर्वी ७१ लाख देशी पर्यटक यायचे, तो आकडा वाढून केवळ ८१ लाख झाला आहे. तयामुळे सरकारने ‘रोड शो’वर केलेला खर्च वाया गेला असे का म्हणू नये, अशी जोरदार विचारणा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली. पर्यटनमंत्री ६० टक्क्यांवर पोचले आहेत, तर संचालक ५ टक्के ठेवतात, असा आरोपही सरदेसाई यांनी यावेळी केला.

सरदेसाई म्हणाले की, पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे विरोधात असताना ते पर्यटन खात्याच्या उधळपट्टीबाबत आवाज उठवत होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे म्हणणे असा खर्च आवश्यक आहे का याची पडताळणी खर्च करण्याआधी झाली पाहिजे, असे होते.

मी आणि खंवटे यांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्याला स्मरून तरी खंवटे यांनी पर्यटन ‘रोड शो’वर केला जाणारा खर्च खरेच आवश्यक आहे का, याचा विचार करावा. स्पेन येथे तीन वेळा ‘रोड शो’ केला; परंतु स्पेनमधून किती पर्यटक आले, याची आकडेवारी त्यांनी द्यावी.

पर्यटन खात्याने दृष्टी जीवरक्षक सेवेसाठी काही अटी घातल्या आहेत, त्या अटींची पूर्तता होते की नाही याची पाहणी पर्यटन खात्यातर्फे केली जाते. या पाहणीत अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आज विधानसभेत म्हणाले. त्यावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, पर्यटक किनाऱ्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालतात, ते जीवरक्षकांनी केलेल्या सूचना ऐकत नाहीत. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत किनाऱ्यावर बुडून मरण्याची एकही घटना घडलेली नाही. कारण त्यावेळी जीवरक्षक तैनात असतात.

२२६ कोटी खर्चूनही ५७ जणांचा मृत्‍यू कसा?

युरी म्हणाले की, किनारी सुरक्षेवर सरकारने २२६ कोटी ८३ लाख रुपये खर्च केले आहेत, तरीही ५६ पर्यटक बुडून मेले. दृष्टी कंपनीला दिलेले कंत्राट ३० जूनला संपले आहे. हे कंत्राट संपणारी याची आधीच कल्पना असूनही नवे कंत्राट देण्यासाठी पर्यटन खात्याने वेळेत निविदा का मागवली नाही?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT