Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao : भाजपने न दिलेल्या योजनांचे खरेतर चिंतन करायला हवे

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची खोचक टीका

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Congress : भाजपने सत्तेत असलेल्या सर्व राज्यातील सरकारतर्फे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले. त्याप्रमाणे गोव्यातही त्यापद्धतीने शिबिर झाले, भाजपचा तो पक्षीय कार्यक्रम असला तरी राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी का झाली नाही, बेरोजगारीचा प्रश्‍न का सुटला नाही, यावर चिंतन होणे अपेक्षीत होते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘गोमन्तक''कडे बोलताना दिली.

दक्षिण गोव्यात दोन दिवसीय भाजपचे चिंतन शिबिर झाले, त्याला कोणाचाच आक्षेप नाही. परंतु डबल इंजिन सरकार मानणाऱ्या भाजपने राज्यातील बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविला आहे का? तो का सुटला नाही? त्याचबरोबर निवडणुकीच्यावेळी जी आश्‍वासने दिली होती, त्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही का? असा सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या दोन दिवसीय शिबिरात खात्यांना निधी वेळेत मिळत नसल्याची तक्रार मंत्र्यांनी केली. त्यानंतर विकसित भारत २०४७ ही संकल्पना मांडण्यात आली. दुसऱ्या दिवशी ज्या काही संकल्पना मांडल्या त्या अंमलात आणण्यासाठी निधीची गरज आहे.

परंतु पहिल्याच दिवशी खात्यांच्या कामांना मंजूर झालेला निधी वेळेत मिळत नसल्याची खंत मंत्र्यांनी व्यक्त केली, ती नक्कीच सरकारला चिंतन करायला लावणारी आहे.

पहिल्यांदाच अशा प्रकारचे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकारचे चिंतन शिबिर पार पडले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या योजना व राज्य सरकारची अंमलबजावणी याचा ऊहापोह या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला. या शिबिराविषयी अधिक माहिती पुढे आली नसली तरी जी हाती आली आहे, त्यावरून आता विरोधी पक्ष प्रश्‍न उपस्थित करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT