Panaji Smart City : पणजी ‘स्मार्ट सिटी’चे वाजले तीनतेरा! खड्डे भरले, सर्वत्र दुर्गंधी

सांडपाणी रस्त्यावर : खड्डे भरले, सर्वत्र दुर्गंधी; सरकारच्‍या नावाने लोक मोडताहेत बोटे
Panaji Smart City potholes filled stink Sewage road Anger among citizens
Panaji Smart City potholes filled stink Sewage road Anger among citizensDainik Gomantak

Panaji Smart City : राजधानी पणजीतील ‘स्मार्ट सिटी’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील अशी आश्‍‍वासनांवर आश्‍‍वासने देण्‍यात आली. परंतु ती काही पूर्ण झालेली नाहीत. आता तर पावसाळा सुरू झाल्याने यात सांडपाणी, मलनि:सारणाचे पाणी आणि गटारांतील पाणी मिसळत आहे. सांतिनेज परिसरात हे सर्व पाणी एकत्रित रस्त्यावर वाहत असल्‍याने लोकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ‘स्मार्ट सिटी’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जातील असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले होते. परंतु त्‍यांना ते पूर्ण करता आलेले नाही. राज्यात मॉन्सून दाखल झाल्यामुळे या कामांचे तीनतेरा वाजले आहेत. काल दिवसभर आणि रात्री पाऊस पडत राहिल्याने, सुरू असलेले कामाचे खड्डे पावसाच्या पाण्याने भरले. त्यातच मलनि:सारण आणि सांडपाण्याच्या पाईप फुटल्याने हे सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले.

Panaji Smart City potholes filled stink Sewage road Anger among citizens
Panaji Smart City : पणजीतील वाहतूक कोंडीबाबत प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

पणजी बुडण्याच्या शक्यतेवर बाबूश यांची सावध भूमिका

‘स्मार्ट सिटी’च्या कामाच्या दर्जावर प्रश्‍न उपस्थित करणारे महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सध्या पणजीत पाणी साचण्याच्या शक्यतेवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. पावसाळा आत्ताच सुरू झाला आहे आणि त्याविषयी विधान करणे अकाली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. पणजीत पाणी साचण्याची भीती यापूर्वी व्यक्त होत होती.

Panaji Smart City potholes filled stink Sewage road Anger among citizens
Panaji News : कदंब गाड्यांची अनुपलब्धता खासगी बसमालकांच्या पथ्यावर

स्मार्ट सिटीच्या कामांचा हा परिणाम असेल, असे सर्व स्तरातून सांगितले जात होते. तेव्हा आमदार बाबूश यांनी स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जावर प्रश्‍न उपस्थित केला होता. वारंवार पत्रकारांकडून याबाबत प्रश्‍न विचारले जात असल्याने बाबूश यांनी हेच मुद्दे वरचेवर उपस्थित करू नका, असा सल्लाही दिला. शिवाय स्मार्ट सिटीच्या प्रश्‍नावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. बायंगिणी कचरा प्रकल्प होणारच असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Panaji Smart City potholes filled stink Sewage road Anger among citizens
Panaji : साहित्यामुळे माणूस समृद्ध होतो : डॉ. सोमनाथ कोमरपंत

नागरिकांमध्ये भीती

या प्रकारामुळे पणजीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ते संताप व्‍यक्त करीत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या नळांमध्ये हे प्रदूषित पाणी शिरल्यास त्याचा लोकांच्‍या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे किंवा बंद करावे अशी मागणी पणजीतील लोक करीत आहेत. अन्यथा सर्वत्र रोगराईची समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांना सतावत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com