Goa LOP Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: 'गोव्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सुरु, गोमंतकीयांची खरी ओळख...'; आलेमाव स्पष्टच बोलले

गोमन्तक डिजिटल टीम

सर्व जाती धर्मातील लोकांशी बंधूभाव जपणारे,अशी गोमंतकीयांची ओळख आहे. सध्या राज्यातील शांतता, जातीय सलोखा बिघडविण्याचे कार्य सुरू आहे ते थांबायला हवे. आम्ही सर्वानी एकत्र राहावे आणि राज्याचा नाश करू पाहणाऱ्या भाजप सरकार विरोधात एकत्र यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लोस फरेरा, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

युरी आलेमाव म्हणाले की, आज लोकांनी महात्मा गांधी यांचे विचार जोपासून त्यांच्या विचारांनी वागणे गरजेचे आहे. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप म्हणाले की, राज्यातील जमीन विक्रीचे प्रकार वाढू लागले आहेत. आमच्या पुढच्या पिढीला जमीन राहणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तोंडात महात्मा गांधी आहेत, पण काळजात नथुराम गोडसे आहे. आम्हाला गांधींचे विचारांनी देश पुढे न्यायचा की गोडसेंच्या विचाराने हे ठरवायला हवे. राज्यात जातीय सलोखा बिघडविण्याचे काम होत असल्याने ते संबंधित नेत्यांनी थांबवावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्नाटककडून पाणी वळविण्याचे काम पुन्हा सुरू, प्रमोद सावंतांना म्हादईपेक्षा खुर्चीची जास्त चिंता; युरी आलेमाव

Goa Today's News Live: वेलिंगकरांविरोधात मडगाव पोलिस स्थानकावर निर्देशने!

IFFI Delegate Registration: तुमची उपस्थिती अगत्याची! 'इफ्फी'च्या प्रतिनिधी नोंदणीस सुरुवात; जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया

Goa News: सुभाष वेलिंगकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक; मंत्री सिक्वेरा म्हणाले सरकारही दखल घेणार

Secunderabad Vasco-Da-Gama Express: तेलंगणातून गोव्यासाठी धावणार एक्सप्रेस; रविवारी शुभारंभ, जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT