Yuri Alemao: आश्‍वासन दिलेल्या 'त्या' नोकऱ्या कुठे आहेत? बेरोजगारीवरून युरींची प्रश्नांची सरबत्ती

Goa Unemployment Rate: राज्यातील तरुणांचे असे हाल पहावयास मिळणे त्रासदायक असल्याची खंत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.
Goa Unemployment Rate: राज्यातील तरुणांचे असे हाल पहावयास मिळणे त्रासदायक असल्याची खंत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.
Goa Unemployment Rate|Yuri AlemaoCanva
Published on
Updated on

Yuri Alemao About Unemployment Rate In Goa

पणजी: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जाहीर केलेल्या मोजक्याच नोकऱ्यांसाठी बेरोजगारांच्या पर्वरी येथे रांगा लागल्या होत्या. राज्यातील तरुणांचे असे हाल पहावयास मिळणे त्रासदायक असल्याची खंत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रत्येक निवडणुकीपूर्वी राज्यातील युवकांना १० हजार नोकऱ्या देण्याचे भाजपकडून दिले आश्‍वासन दिले जाते, त्या नोकऱ्या गेल्या कुठे,असा सवालही त्यांनी केला.

आलेमाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आश्‍वासन दिलेल्या त्या नोकऱ्या कुठे आहेत? भाजप राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवत आहे.

Goa Unemployment Rate: राज्यातील तरुणांचे असे हाल पहावयास मिळणे त्रासदायक असल्याची खंत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.
Yuri Alemao: पर्यटनमंत्र्यांनी आदर्श उदाहरण समोर ठेवले; युरींकडून कौतुक

वेळोवेळी केलेल्या मजूर सर्व्हेनुसार राज्यातील बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. मुख्यमंत्र्यांनी नोकऱ्यांचे आश्वासन दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणतात, सर्वांना नोकऱ्या देता येणार नाहीत. त्यामुळे तानावडे यांना कदाचित मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले हे माहीत नसावे. तरूणांना विदेशाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com