Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: केंद्रीय एजन्सीद्वारे संपुर्ण ऑडीट केल्यानंतरच झुआरी इंधन पुरवठा कार्यान्वित करा

दैनिक गोमंतक

Yuri Alemao: झुआरी इंडियन ऑइल टँकिंग लिमिटेडने पेट्रोलियम उत्पादनांच्या गळतीचा स्त्रोत गंजलेला पाईप असल्याचा दावा केल्यामुळे, सदर ऑपरेशन्सवर लक्ष ठेवण्यात स्थानिक सरकारी प्राधिकरणांचे संपूर्ण अपयश आणि नियमित देखभालीचा अभाव समोर आला आहे.

या कंपनीच्या टाक्यांसाठी इंधन पुरवठा परत सुरू करण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीद्वारे सर्वसमावेशक ऑडिट करण्यात यावी, अशी मागणी गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

या घटनेने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह स्थानिक सरकारी यंत्रणा पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत. लोकांचा या सर्व सरकारी यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. मुरगाव तालुका टिकिंग बॉम्ब बनत आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

केवळ आणि केवळ केंद्रीय एजन्सीद्वारे ऑडिट करून घेतल्यानंतरच इंधन पुरवठा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी युरी आलेमाव यांनी केली.

इंधन गळतीमुळे बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याबाबत सरकार गप्प आहे. झुआरी कंपनीला पर्यावरणाचा नाश आणि लोकांचे आरोग्य धोक्यात आणल्याबद्दल कठोर दंड करणे आवश्यक आहे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

दरम्यान, झुवारी कंपनीची पाईपलाईनमधील गळती सापडली आहे. गळतीचे ठिकाण वालेस जंक्शनजवळ आहे. ही गळती बंद करण्याचे काम सुरू असून दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार आहेत, अशी माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : वेश्या व्यवसायातील २१ कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

Panaji News : मळा-पणजीतील शाळेलाही बजावली नोटीस; अतिरिक्‍त शुल्‍क आकारणी प्रकरण

Goa Rain Update : ‘अवकाळी’सोबत उद‌्भवली वीज खंडित होण्याची समस्‍या

Goa News : धार्मिक भावना दुखावल्‍याने भाविक संतप्‍त; दोघींना अटक

IPL 2024 Playoffs Full Schedule: कोण कोणाशी भिडणार, कधी होणार फायनल? वेळ, तारीख, मैदान प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्र

SCROLL FOR NEXT