Motorcycle rally

Atal Bihari Vajpayee

 

Dainik Gomantak 

गोवा

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सांगेत युवकांची दुचाकी रॅली

जांबावली येथील दामोदर देवाला नमन करून सदर रॅलीला (Rally) प्रारंभ करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

केपे: भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 97 व्या. जयंती निमित्त सांगे युवा मंडळ व सांगे मंडळातर्फे सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली.

जांबावली येथील दामोदर देवाला नमन करून सदर रॅलीला (Rally) प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुभाष फळदेसाई यांच्याबरोबर राष्ट्रीय युवा महिला उपाध्यक्ष अर्पिता जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर व मोठ्या ससंख्येने युवा कार्यकर्ते व महिला (Women) या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) ह्यांच्या मुळे देशाचे नाव उज्वल झाले असून त्यांचे नाव भारतातील (India) प्रत्येक नागरिक आदराने घेत आहेत व यावरून त्यांची लोकप्रियता कळून येते असे त्यांनी सांगितले.

सुभाष फळदेसाई यांनी या रॅलीत आपले जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले. सदर रॅली जांबावली येथून सुरू करण्यात आली ती नेत्रावळी, वाडे, भाटी, वालकीनी उगे या नंतर या रॅलीचा समारोप सांगे बस स्थानकावर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT