'स्वच्छ व सुंदर साखळी' हेच आपले ध्येय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी येथील नवीन अत्याधुनिक कदंबा बसस्थानकाचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते.
Pramod Sawant Sanquelim

Pramod Sawant

Sanquelim

Dainik Gomantak

Published on
Updated on

साखळी: "साखळीचा मास्टर प्लान" डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच साखळीत असंख्य विकासकामे राबवली. "स्वच्छ व सुंदर साखळी" हेच आपले ध्येय आहे,असे उदगार मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी काढले. साखळी येथील नवीन अत्याधुनिक कदंबा बसस्थानकाचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, कदंबा महामंडळाचे चेअरमन दिपक नाईक, साधन सुविधा मंडळाचे संचालक दत्ताराम चिमुलकर, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, भिमराव देसाई आदींची उपस्थिती होती.

Pramod Sawant

Sanquelim

त्या आमदाराकडून जीवाला धोका, अ‍ॅड. रॉड्रिग्ज यांची पोलिसात धाव

साखळीच्या (Sanquelim) विकासाची माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) पुढे म्हणाले साखळीचे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत मोडकळीस आली होती तिची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी महाविद्यालयाच्या इमारतीचा विस्तार करुन दर्जा वाढविण्यात आला. गेली पंधरा वर्षे रेंगाळत पडलेले साखळीचे मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित केले. गृहनिर्माण वसाहतीमध्ये राखीव जागेत नवीन सभागृह तसेच वन खात्यातर्फे उपवन विभाग निर्माण करुन औषधी झाडे लावली बालोद्यान उभारले. साखळी येथील साई नर्सिग इन्स्टीट्युटची स्वातंत्र्य इमारतीचे काम सुरु आहे. ज्या इन्स्टीट्युट मधून पाचशे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांना रोजगार लाभला आहे.

Pramod Sawant

Sanquelim

TMC-MGP यांच्या युतीमुळे भाजप-कॉंग्रेस यांच्या गोटात चिंतेचं वातावरण

साखळी पालिकेतर्फे जी विकासकामे केली जातात त्यालाही शंभर टक्के विकासनिधी हा सरकारतर्फेच (Government) पुरवला जातो. होंडा जंक्शन ते साखळी हॉस्पिटल जंक्शनचे रुंदीकरण व विद्युत रोषणाईने शुशोभिकरण लवकरच हाती घेण्यात येईल. साखळी बसस्थानकाचे फित कापून मुख्यमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.आनंद काणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सिध्दी पोरोब यांनी आभार प्रदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com