Canacona News Dainik Gomantak
गोवा

Canacona News : खोती गावातील युवकांच्या श्रमदानामुळे काणकोणात झालाय मोठा बदल, वाचा सविस्तर

तळपण नदीच्या वरच्या बाजूकडील पात्रातील घन कचऱ्याचे संकलन

गोमन्तक डिजिटल टीम

सुभाष महाले

काणकोण : युवा शक्तीने पुढाकार घेतला, तर राज्यातील नदी पात्रे घन कचरामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. मात्र त्यासाठी संघ शक्तीची इच्छाशक्ती हवी. त्या इच्छाशक्तीची एक झलक आमोणे-पैंगीण, गावडोंगरी व खोतीगावातील काही समविचारी युवकांनी दाखवली. तळपण नदीच्या वरच्या बाजूकडील पात्रातील घन कचऱ्याचे संकलन केले.

त्याच बरोबर घन कचरा नदीच्या पात्रात फेकून जलस्रोत धोकादायक व प्रदूषित करू नका. त्याचा जलचरांवर विपरीत परिणाम होतो. हा कचरा शेवटी नदी समुद्राला मिळत असल्याने समुद्रही प्रदूषित होतो. याबाबत युवकांतर्फे जागृती करण्यात आली.

या कचरा संकलन चळवळीत डझनभर युवकांचा सहभाग होता. येणाऱ्या काळात ही चळवळ व्यापक होईल, अशी अपेक्षा आहे. या युवकांनी नदी पात्र कचरामुक्त करण्याचा श्री गणेशा घालून दिला आहे. समविचारी युवकांनी शिक्षक देवेंद्र तवडकर यांच्या नेतृत्वानुसार तळपण व तिच्या उपनद्यांच्या पात्रांची स्वच्छता केली आहे.

चार दिवस दहा युवा-युवतींनी नदी पात्रातील पिकनिक हॉटस्पॉट जागा हेरून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. नदी किनारी काही देशी पर्यटक मौजमजा करण्यासाठी अशा नदीकाठच्या जागा हेरतात. मात्र त्याजागी प्लास्टिक कचरा व बिअरच्या रिकाम्या बाटल्या टाकतात. पावसाळ्यात हा अविघटनशील कचरा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत समुद्रात जातो.

त्याचा अनिष्ट परिणाम जलचरांवर होत आहे. पर्यटकांनी अवश्य नदीच्या काठावर निसर्ग मजा लुटावी, मात्र मौजमजा करताना निसर्गाचा समतोल ढळू देता कामा नये, हाच संदेश या अभियानातून तमाम जनतेला देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र तवडकर यांनी सांगितले.

नदीतही जलप्रदूषण

पूर्वीच्या काळी नदी पात्रातील वाहते पाणी बिनधास्त पिण्यासाठी वापरण्यात येत होते, मात्र मानवी हस्तक्षेपामुळे आणि घन कचऱ्यांमुळे पाणी धोकादायक बनले असून नदीत जलप्रदूषण झाले आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र तवडकरच्या नेतृत्वाखाली आमोणे, गावंडोगरी, खोतीगाव भागातील काही होतकरू तरुण पुढे येऊन कचरामुक्त नदी व गाव करण्यासाठी आपला वेळ देत आहेत. त्याच्या कार्याची दखल घ्यायलाच हवी, असे खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT