Vande Bharat Express मुळे एका नव्या क्रांतीला सुरूवात - राणे

कुंभारखण-पिसुर्ले येथे ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रम
Vande Bharat Express
Vande Bharat Express Dainik Gomantak
Published on
Updated on

Vande Bharat Express पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज दि. 27 जूनपासून देशात सुरू करण्यात आलेल्या ‘वंदे भारत’ रेल्‍वेमुळे एका नव्या क्रांतीची सुरूवात झाली आहे. पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ असलेल्‍या या रेल्‍वेमुळे दळणवळण व्यवस्थेत फार मोठी मजल गाठता येणार आहे.

दुरदृष्‍टी असलेल्‍या या नेत्‍याचे हात आणखी बळकट करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संघटितपणे कार्य‌‌‌ करून मेरा बूथ ‘सबसे मजबूत’ बनविला पाहिजे, असे उद्‌गार पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी काढले.

पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील कुंभारखण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्‍हर्च्युअल पद्धतीने केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमानंतर राणे बोलत होत्‍या.

Vande Bharat Express
World MSME Day: दिव्यांगांना समान रोजगार संधी द्या- हाजिक

यावेळी होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, भाजप संघटक विनोद शिंदे, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, ठाणे सरपंच सरिता गावकर, केरी सरपंच दीक्षा गावस यांच्यासह विविध पंचायतींचे उपसरपंच, पंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे आचरण करताना व पक्षकार्य करताना देशसेवा प्रथम हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे. त्यामुळे पक्षकार्य वाढण्यास आपोआप मदत होईल.

पर्ये मतदारसंघातील सर्व बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ केला पाहिजे. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य दिले जाणार आहे, असेही डॉ. दिव्‍या राणे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com