Goa Accident Deaths Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरून युवक ठार; कुंडई येथील घटना

कामावरून सुटल्यानंतर घरी परतताना झाला अपघात

दैनिक गोमन्तक डिजिटल

कुंडई येथे उतरणीवर शुक्रवार, 21 रोजी झालेल्या अपघातात फोंड्यातील युवक ठार झाला. मृत युवकाचे नाव शौनक दिलीप नाईक (24) असे असून तो दुर्गाभाट-फोंडा येथील पुष्पकमल हाउसिंग सोसायटीत राहात होता.

शौनक नाईक हा दोन महिन्यांपूर्वीच कुंडई येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला लागला होता. कामावरून सुटल्यानंतर घरी परतताना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याला कुंडई येथे अपघात झाला.

रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून त्याची जीए ०५ क्यू ५५९० या क्रमांकाची दुचाकी घसरली आणि तो रस्त्यावर फेकला गेला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला लागलीच गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले.

मात्र, (शनिवारी) सकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. शौनक हा नाईक कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे.

मनमिळाऊ स्वभावाचा शौनक परिसरातील सर्वांच्या परिचयाचा होता. दुपारी त्याच्या पार्थिवावर फोंड्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी फोंडा शहरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT