Goa Crime Canva
गोवा

Colva Crime: कोलव्‍यात पुन्हा राडा! पार्टीतील वादातून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; अर्धमेल्‍या युवकाला बाणावलीत सोडले

Colva Crime News: कोलवा येथे वादावादीतून रेमी फर्नांडिस या युवकाला काही युवकांच्‍या गटाकडून जबर मारहाण करून त्‍याचे अपहरण करण्‍याची घटना घडली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News

मडगाव: कोलवा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत पुन्‍हा एकदा वादावादीतून मारहाणीची घटना घडली असून काल कोलवा येथे वादावादीतून रेमी फर्नांडिस या युवकाला काही युवकांच्‍या गटाकडून जबर मारहाण करून त्‍याचे अपहरण करण्‍याची घटना घडली. या युवकाला जबरदस्‍त मारहाण करून नंतर अर्धमेल्‍या अवस्‍थेत त्‍याला बाणावली येथील मारिया हॉलजवळ सोडून देण्‍यात आल्‍याची तक्रार पोलिसात नोंद केली आहे.

या प्रकरणात पोलिस दफ्‍तरी हिस्‍ट्रीशिटर म्‍हणून नाव नोंद असलेला कुख्‍यात गुंड वॉल्‍टर फर्नांडिस आणि त्‍याच्‍या साथीदाराचा समावेश असून सध्‍या हे गुंड फरार झाल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे. कोलवा पोलिस त्‍यांच्‍या शोधात आहेत. संशयितांच्‍या विरोधात पोलिसांनी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पोलिस निरीक्षक रितेश तारी हे तपास करीत आहेत.

बाणावलीत आणून सोडले

या प्रकरणाची माहिती अशी की, गुरुवारी पहाटे ४ वाजण्‍याच्‍या सुमारास हा प्रकार घडला. कोलवा येथे मार्गारेटा क्‍लब येथे पार्टी चालू असताना काहीजणांमध्‍ये वाद चालू झाला. त्‍यानंतर त्‍यातील रेमी फर्नांडिस हा युवक बाहेर आला असता स्‍थानिक गुंड वॉल्‍टर फर्नांडिस आणि त्‍याच्‍या साथीदाराने त्‍याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्‍यास सुरुवात केली. त्‍यानंतर एका काळ्‍या रंगाच्‍या गाडीत घालून त्‍याचे अपहरण केले. पुन्‍हा त्‍याला मारहाण करून नंतर बाणावली येथील मारिया हॉलजवळ सकाळी ७.३० वाजण्‍याच्‍या सुमारास सोडून देण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT