Zuari Bridge  Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge: नव्या झुआरी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या, सापडला नाही मृतदेह

एक दिवस उलटून गेला तरी अद्याप सापडला नाही मृतदेह

Pramod Yadav

नुकतेच वाहतुकीस खुला झालेल्या नव्या झुआरी पुलावरून नदीत उडी घेत एकाने आत्महत्या केली आहे. पुल सर्वांसाठी खुला झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे. दरम्यान, घटनेला एक दिवस उलटून गेला तरी युवकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. नदीत शोधकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुठ्ठाळीतील नव्या झुआरी पुलावरून शुक्रवारी संध्याकाळी एका युवकाने नदीत उडी घेत आत्महत्या केली. युवकाने उडी घेतली त्यावेळी अनेकांनी त्याला पाहिले असल्याचे सांगितले जात आहे. घटनेला एक दिवस उलटून गेला तरी, युवकाचा मृतदेह अद्याप सापडला नाही.

लालसाब खोलकर (वय 22, रा. वास्को) असे या युवकाचे नाव आहे. उडी घेतल्यानंतर त्याला वाचविण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र, त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम अद्याप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एक दिवस उलटून गेल्यानंतर देखील त्याचा मृतदेह सापडला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेची आगशी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT