हणजूण येथील गेस्ट हाऊसमध्ये उतरली बिहारी महिला, कर्नाटकचा युवक संधी साधून तिच्या खोलीत घुसला अन्...

याप्रकरणी 10 मार्च रोजी महिलेने म्हापसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
Mapusa Police
Mapusa Police Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

उत्तर गोव्यातील हणजूण येथील एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये बिहारची रहिवाशी महिला थांबली होती. दरम्यान, महिला थांबलेल्या गेस्ट हाऊसच्या खोलीत एक कर्नाटकचा युवक घुसला व त्याने महिलेच्या महागड्या वस्तूंवर हात साफ केला.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक बिहारी महिला हणजूण येथील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबली होती. संधीचा फायदा घेऊन एक युवक महिलेच्या खोलीत घुसला. कर्नाटक रहिवाशी असलेल्या या युवकाने महिलेचा आयफोन-12 हा महागडा मोबाईल, 2,000 हजार रूपये रोख रक्कम असलेली पर्स, दोन एटीएम कार्ड तसेच, महत्वाचे कागदपत्रे याची चोरी या युवकाने केली. सर्व साहित्याची किंमत एक लाख रूपये असल्याचे महिलेने म्हटले आहे.

याप्रकरणी 10 मार्च रोजी महिलेने म्हापसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Mapusa Police
Watch Video: ओल्ड गोवा चर्चसमोर महिला पर्यटकाचा फुल्ल राडा; शिवीगाळ, स्पर्श केल्याचा आरोप

पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत तपास सुरू केला आणि अवघ्या सहा तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी अमरेश औझाप्पा राठोड (वय 22, रा. मुळ कर्नाटक) याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी संशयित आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pakistan Defense Minister Khawaja Asif Video
India Wins Gold Medal in Asian Games Women Cricket 2026
Smriti Mandhana Record in Asian Games 2026
Morjim Drugs Bust
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com