Goa - Mumbai Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Goa - Mumbai Highway Accident : पेडणे येथील दुचाकी अपघातात सावंतवाडीतील युवक ठार

रुग्णवाहिका पोहचण्यास उशीर झाल्याने युवकाचा मृत्यु, स्थानिकांचा आरोप

Rajat Sawant

धारगळ पेडणे येथे आज दुपारी दुचाकीचा एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 25 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे. मात्र, घटनास्थळी रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने युवकाचा मृत्यु झाला असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मृत दुचाकीस्वार सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील असल्याचे समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने वासुदेव पेडणेकर (25) रा. निरवडे हा युवक दुचाकीवरुन जात होता. यावेळी तो धारगळ पेडणे येथे आला असता दुचाकी घसरुन महामार्गाच्या दुभाजकाजवळील सीमेंटच्या खांबाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की तो खांब तुटला.

या अपघातात दुचाकीस्वार वासुदेवच्या डोक्याला गंभीर जखम होउन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. महामार्गावरील प्रवाशांनी व स्थानिकांनी जखमी दुचाकीस्वाराल रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. दरम्यान, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचण्यात उशीर झाल्याने युवकाचा जागीच मृत्यु झाला.

मिळालेल्या ओळखपत्रावरुन वासुदेव हा गोव्यातील एका कंपनीत कामाला होता. तो गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. युवकाच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT