Sanguem Youth Drowned Dainik Gomantak
गोवा

Sanguem Youth Drowned: कुर्पे येथे खाणीत युवकाचा बुडून मृत्यू?

आत्महत्या केल्याचा संशय

गोमंतक ऑनलाईन टीम

Sanguem Youth Drowned: सोमवारी मैनापी धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू, त्यानंतर मंगळवारी एका 16 वर्षीय युवकाचा चिरेखाणीत बुडून मृत्यू झालेल्या काही तास उलटत नाहीत तोपर्यंत बुडून मृत्यू होण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. कुर्पे सांगे येथे सर्वेश वाडेकर (वय 21) या तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

वाडेकर याचा मृत्युदेखील खाणीतील पाण्यात बुडून झाला आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. वाडेकर याचा मृतदेह अद्याप आढळून आलेला नाही. तथापि, घटनास्थळावरून त्याचे चप्पल आणि कपडे आढळून आले आहेत. दरम्यान, हा अपघात आहे आत्महत्या याचा शोध पोलिस घेत आहेत.

कुर्पे गावातील खाणीत पावसामुळे पाणी भरले आहे. कुडचडे अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे पाण्यात शोध घेतला, तथापि त्यांना मृतदेह आढळून आलेला नाही. रात्र झाल्याने शोध थांबवण्यात आला. उद्या सकाळी शोधमोहिम पुन्हा सुरू केली जाणार आहे.

सर्वेश वाडेकर याची मनस्थिती गेले काही दिवस चांगली नव्हती, असे सांगितले जात आहे. आज सायंकाळी साडे सहा वाजता तो कुणालाही न सांगता घराबाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ तो घरी न परतल्याने त्याचा शोध घ्यायला सुरवात झाली. यावेळी खाणीजवळ त्याचे कपडे आणि चप्पल आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT