Youth Congress Goa  Dainik Gomantak
गोवा

Margao News : राज्यात कोळसा वाहतूक त्वरित बंद करा : महेश नाडर

युवक काँग्रेसची मागणी : 15 वर्षांवरील जुनी वाहनेे स्क्रॅप करण्यास विरोध कायम

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : एकीकडे प्रदूषणाचे कारण देत 15 वर्षांवरील वाहने स्क्रॅप करण्याची मोहीम राबवताना दुसरीकडे मात्र वातावरणाला मारक असलेल्या कोळसा वाहतुकीला प्रोत्साहन देत राज्य सरकार प्रदूषणाच्या बाबतीत दुहेरी मापदंड वापरत आहे. कोळसा वाहतूक त्वरित बंद करणे करावी आणि जुने वाहने स्क्रॅप पॉलिशीही रद्द करावी, अशी मागणी दक्षिण गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर यांनी केला आहे.

गोवा प्रदेश युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुटबण जेटी येथे सोमवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वच्छता मोहिमेवेळी ते बोलत होते. कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यासाठी वीजेच्या नैसर्गिक स्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असताना राज्य सरकार मात्र कोळसा वाहतुकीला प्रोत्साहन देत प्रदूषणामध्ये भर घालत आहे. सरकार याचे कसे समर्थ करेल, असा सवालही त्यांनी विचारला.

अधिकारी तसेच सरकारी यंत्रणेने स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीसुद्धा निसर्गाप्रति आपले कर्तव्य समजून जबाबदारीने वागले पाहिजे, असे ते म्हणाले. जेटीवर जमलेल्या स्वयंसेवकांनी यावेळी जेटीवरील कचरा एकत्र केला. खुल्या जागेत कचरा टाकणे टाळले पाहिजे. कचऱ्याचे वर्गीकरण करून लोकांनी एका ठरवून दिलेल्या जागेवर तो टाकला पाहिजे, असे नाडर म्हणाले.

कचऱ्यामुळे गटारे तुंबतात. त्यामुळे पावसाळ्यात पुरासारखी परिस्थिती उद्‍भवते. हा कचरा पाण्याच्या स्रोतांमध्ये जमा होतो. त्यामुळे वातावरणाची हानी होते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आमची सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते हे देखील सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

प्लास्टिकचा वापर कमी करा

राज्य युथ काँग्रेसच्या उपाध्यक्ष केनिशा मिनेझिस यांनी प्लास्टिक कचरा हे मोठे आव्हान असल्याचे यावेळी सांगितले. लोकांनी प्लास्टिकचा वापर हळूहळू करून कमी केला पाहिजे. प्लास्टिकला पर्याय असलेल्या वस्तू वापरल्या पाहिजेत. त्यामुळे आम्हाला आमचा निसर्ग वाचवणे शक्य होणार आहे. निसर्गाला पूरक बाबी अनुसरल्या पाहिजेच. त्यामुळे आम्ही बदल घडवू शकतो, असे त्या म्हणाल्या. युथ काँग्रेसने यावेळी लोकांना मोठ्या संख्येने झाडे लावण्याचे आवाहन करताना त्यांनी निगा राखण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT