Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Minister Vishwajeet Rane: सावधान...हृदयविकाराचा तरुणाईला धोका

Minister Vishwajeet Rane: 25 ते 35 वयोगटातील तरुण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गोमेकॉमध्ये हृदयविकाराची तक्रार घेऊन दाखल होणारे तरुणच जास्त प्रमाणात असतात

दैनिक गोमन्तक

Minister Vishwajeet Rane: 25 ते 35 वयोगटातील तरुण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गोमेकॉमध्ये हृदयविकाराची तक्रार घेऊन दाखल होणारे तरुणच जास्त प्रमाणात असतात, असे निरीक्षण आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी नोंदवले. ते म्हणाले की, आरोग्याची काळजी सुरवातीपासूनच घेतली पाहिजे.

आवश्यकतेनुसार जीवनशैलीत बदल केला पाहिजे. त्याविषयीचे समुपदेशन करण्याची सोयही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सरकारने केली आहे.

पर्वरी येथे डायलिसिस केंद्राच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते म्हणाले, अलीकडे तरुणाईने भलतीच फॅशन अवलंबली आहे. त्यात त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. काहींना पक्षाघाताचा झटका येतो आणि आयुष्यभऱ त्यांची सेवा करण्याची नामुष्की पालकांवर येते. तरुणाईने आपल्या प्रकृतीकडे विशेषतः तरुण वयातच लक्ष दिले पाहिजे. त्यातून आयुष्याच्या उत्तरार्धात होऊ शकणारी वैद्यकीय गुंतागुंत टाळता येते.

सरकार चांगल्यातली चांगली आरोग्य सेवा देऊ शकते; पण आपले आरोग्य आपणच सांभाळायचे असते. मधुमेह वाढत आहेत. जीवनशैलीचा आजार म्हणून तो ओळखला जातो. सरकार मधुमेहावरील विविध

पॅथीतील औषधे मोफत देते. इन्सुलीन मोफत देते. मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होते. त्यामुळे डायलिसिसची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर करण्याची वेळ आली आहे. सरकार त्याची व्यवस्था करेल. मधुमेहातून मुक्तीसाठी जीवनशैलीतील बदल आवश्यक आहे. तो प्रत्येकाने केला पाहिजे. त्याची माहिती देण्याची, समुपदेशनाची व्यवस्था केली आहे.

कवटी न उघडता ट्यूमरची शस्त्रक्रिया

व्यक्तीच्या डोक्याची कवटी न उघडता आधुनिक तंत्रज्ञानाने ट्यूमरची शस्त्रक्रिया करण्यास गोमेकॉमध्ये लवकरच सुरवात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. केवळ इमारती बनवून आरोग्य केंद्र सुसज्ज होत नाही, तर त्याला प्रशिक्षित मनुष्यबळाचीही गरज लागते. त्यासाठी अशा व्यक्तींना नेमण्यासाठी एखादे धोरण तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT