Voting fever' on social media too Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: मतदान हे देशाप्रती कर्तव्य बजावण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election 2024: मतदान हे देशाप्रती कर्तव्य बजावण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे. मतदान केल्यावर इतरांनाही फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲपवर स्टेट्स तसेच स्टोरी ठेवून लोकशाहीच्या उत्सवाची जागृती खासकरून तरुणाईने केली.

आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा, असा संदेश देणारे फोटो, व्हिडिओ लोकांनी मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर टाकले होते. लोकशाही (Democracy) उत्सवाला तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला. निवडणूक आयोग, सरकारी यंत्रणा, राज्यातील महनीय व्यक्तींनीदेखील नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी समाजमाध्यमांद्वारे आवाहन केले. अनेक नवमतदारांनी मतदान केंद्राबाहेर उभे राहून बोटाला लावलेली शाई दाखवत फोटो काढून तर काहींनी मतदान प्रमाणपत्रासोबत फोटो काढून मतदानास प्रवृत्त केले.

व्हिडिओ, रिल्सचा ट्रेंड

इन्स्टाग्राम (Instagram) तसेच फेसबुकवर मतदानासाठी प्रवृत्त करणारे व्हिडिओ, रिल्स आज ट्रेंडिंगमध्ये होते. मराठी, कोकणी तसेच इंग्रजी गाण्यांच्या साहाय्याने अनेकांनी रिल्स बनवून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या या रिल्सना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

निवडणूक आयोग सक्रिय

निवडणूक आयोगानेही समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी आवाहन केले. महनीय व्यक्ती, खेळाडू, कलाकार, साहित्यिक, दिव्यांग यांच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक आयोगाद्वारे नागरिकांना व्हॉट्स ॲपवर संदेश पाठवून मतदानासाठी प्रवृत्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT