Lok Sabha Election 2024: गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी आज मतदान; 16 उमेदवारांचे भवितव्‍य मतदारांच्‍या हाती

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा महिनाभर धुरळा उडाला. आज दोन्‍ही मतदारसंघातील १६ उमेदवारांचे भवितव्‍य मतदारांच्‍या हाती आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा महिनाभर धुरळा उडाला. आज दोन्‍ही मतदारसंघातील १६ उमेदवारांचे भवितव्‍य मतदारांच्‍या हाती आहे. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंतचे अनेक मुद्दे प्रचारादरम्यान चर्चेत आणले गेले. त्‍या पार्श्वभूमीवर सद्सद् विवेकाला जागणार की आमिषांना बळी पडणार, याचे उत्तर आज मतदान यंत्रात बंदिस्‍त होईल.

इथे मतदारांची खरी कसोटी आहे. एकूण ११ लाख ७९ हजार ३४४ मतदार असून, १,७२५ मतदान केंद्रांवर मतदानोत्‍सव होईल. भाजप (BJP) आणि काँग्रेस अशी प्रमुख लढत असली तरी आरजी, अपक्ष, बसप असे अनेक उमेदवारही रिंगणात आहेत. ढगाळ हवामान आणि वाढलेला उष्मा यामुळे मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडतील का या प्रश्नाचे उत्तरही उद्या मिळणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी, दोन सुरक्षा रक्षक, एक स्थानिक मतदार अधिकारी, दोन स्वयंसेवक असा ताफा आज दुपारनंतर दाखल होणे सुरू झाले.

बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम व फातोर्ड्याचे नेहरू स्टेडियम या दोन्ही ठिकाणी मतदान यंत्रे वितरणाची केंद्रे मुख्य मतदार अधिकाऱ्यांनी तयार केली होती. तेथे विधानसभा मतदारसंघवार मतदान यंत्रांचे वितरण करण्यात येत होते. याआधी त्याच अधिकाऱ्यांच्या समक्ष यंत्र व्यवस्थित चालते याची चाचणीही गेल्या दोन दिवसांत घेण्यात आली होती. मतदान केंद्रावरील मतदारसंख्येला आवश्यक तेवढी यंत्रे पुरवतानाच एक यंत्र जादा पुरवण्यात आले आहे. मतदान हा उत्सव वाटावा यासाठी मतदान केंद्रे पारंपरिक साहित्याचा वापर करून सजवण्यात आली आहेत.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: ''राज्यात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात सावंत सरकार फेल ठरलं''; इंडिया आघाडीचा घणाघात

मतदानाची वेळ:

मतदान सकाळी ७ वाजता सुरू होईल. मतदानास दुपारी जेवणाची सुट्टी नाही. सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत उभे राहणाऱ्यांना मतदान करता येणार आहे.

उमेदवार (उत्तर गोवा)

श्रीपाद नाईक (भाजप)

ॲड. रमाकांत खलप (काँग्रेस)

सखाराम नाईक (अखिल भारतीय परिवार पक्ष)

मिलन वायंगणकर (बसप)

तुकाराम परब (आरजी)

थॉमस फर्नांडिस (अपक्ष)

शकील शेख (अपक्ष)

ॲड. विशाल नाईक (अपक्ष)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: 'हा देश आमचा होता आणि आमचाच राहणार', PM मोदींच्या वक्तव्यावर अकबरुद्दीन ओवेसींचा पलटवार

उमेदवार दक्षिण गोवा

पल्लवी धेंपे (भाजप)

कॅप्टन विरियातो फर्नांडिस (काँग्रेस)

हरिश्चंद्र नाईक (भ्रष्टाचार निर्मूलन पक्ष)

डॉ. श्वेता गावकर (बसप)

रुबर्ट परेरा (आरजी)

आलेक्सी फर्नांडिस (अपक्ष)

दीपकुमार मापारी (अपक्ष)

डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष)

मतदानासाठी आज सुट्टी:

अनेकजण गावी रवाना लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या निमित्ताने आज मंगळवार दि. ७ मे रोजी सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केल्याने अनेकजण आज आपापल्या गावी रवाना झाले. कदंब बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकांवर गावी जाणाऱ्यांची गर्दी दुपारपासून दिसून येत होती. मद्यविक्रीची दुकाने काल सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद आहेत. मतदानाच्या दिवशी म्हणजे उद्या मध्यरात्रीपर्यंत ती बंद राहतील. सरकारने (Government) उद्या सरकारी, निमसरकारी, खासगी तसेच रोजंदारीवरील अशा सर्वच प्रकारचे कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक कामातील कर्मचाऱ्यांनी आपले मतदान टपालाद्वारे केले.

Lok Sabha Election 2024
Goa Lok Sabha Election 2024: मोदीलाटेचा प्रभाव दिसतच नाही! - गिरीश चोडणकर

एकूण पुरुष मतदार

५,७१,६१७

उत्तर गोवा

२,८१,४८६

दक्षिण गोवा

२,९०,१३१

एकूण महिला मतदार

६,०७,७१५

उत्तर गोवा

२,९९,०८८

दक्षिण गोवा

३,०८,६२७

एकूण तृतीयपंथी मतदार

१२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com