Manohar Parrikar
Manohar Parrikar Dainik Gomantak
गोवा

Manohar Parrikar: पर्रीकरांच्या नावे ‘युवा शास्त्रज्ञ पुरस्कार’

दैनिक गोमन्तक

Goa: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाने यापुढे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील‌ युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल केली. चौथ्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सभागृहात करण्यात आले.

पर्रीकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्याच्यातर्फे आयोजित असणारा हा विज्ञान महोत्सव काही दिवस चालणार आहे. 8 ठिकाणी सुरू असलेल्या या महोत्सवात पाच हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यासाठी जगभरातील 17 शास्त्रज्ञ, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वैज्ञानिकता रूजविणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात येणार असून 35 वर्षाखालील वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शास्त्रज्ञाला हा 5 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. यावेळी कचरा व्यवस्थापन आणि कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, लोकसेवा आयोगाचे जुझे मॅन्युअल नोरोन्हा, सचिव रमेशकुमार वर्मा, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक सुनीलकुमार सिंग उपस्थित होते.

मनोहर पर्रीकरांच्या तत्वानुसार कारभार!

श्रद्धांजलीपर भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा कारभार पर्रीकर यांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसार सुरू आहे. त्यांच्या नावाने राज्यात सुरू करण्यात आलेला मोपा विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, क्रीडांगण, स्टेडियम तसेच संरक्षण दलातील संस्थांच्या माध्यमातून त्यांचे नाव अमर राहील. याशिवाय या स्मारकाशेजारी माजी पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मारकाचे नूतनीकरणही लवकरच करण्यात येईल.

पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्ताने सकाळी 9 वाजता मिरामार येथे उभारण्यात आलेल्या ‘स्फूर्तीस्थळ’ या पर्रीकर यांच्या स्मारकावर सरकारतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदरांजली अर्पण केली. सभापती रमेश तवडकर, कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ. दिव्या राणे, उत्पल पर्रीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सेरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

भाजपच्या कार्यालयात पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यासह पर्यटन मंत्री रोहन खंवटे, कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक, केशव प्रभू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यात अनेक युवकांनी रक्तदान केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT