Karapur-Sarvan

 

Dainik gomantak

गोवा

कारापूर-सर्वण पंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश पेडणेकर

विद्यमान पंचायत मंडळात पेडणेकर यांची दुसऱ्यांदा उपसरपंचपदी निवड झाली आहे

दैनिक गोमन्तक

डिचोली : कारापूर-सर्वण पंचायतीच्या उपसरपंचपदाची माळ योगेश पेडणेकर यांच्या गळ्यात पडली आहे. आज पार पडलेल्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान पंचायत मंडळात पेडणेकर यांची दुसऱ्यांदा उपसरपंचपदी निवड झाली आहे.

या पंचायतीचे माजी उपसरपंच दामोदर गुरव यांची सरपंचपदी (Sarpanch) निवड झाल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते. रिक्त उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी आज पंचायत (Panchayat) मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस सरपंच दामोदर गुरव यांच्यासह गोकुळदास सावंत, लक्ष्मण गुरव, योगेश पेडणेकर, सुषमा सावंत, उज्वला कवळेकर, आजस खान आणि महमद हुसेनसाब मदार हे पंचसदस्य उपस्थित होते. तर दत्तप्रसाद खारकांडे, रश्मी नाईक आणि नीता मोरजकर अनुपस्थित होत्या.

योगेश पेडणेकर यांनी सादर केलेला अर्ज निर्वाचन अधिकारी तथा गट विकास कार्यालयातील अभियंते नवनाथ आमरे यांनी ग्राह्य धरून पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT