गुळेली पंचायतीसमोर आंदोलन सुरुच; ग्रामस्थांसह महिलाही तटस्थ

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन सुरू असल्यामुळे काही प्रमाणात याची झळ विद्यमान सरकारला बसण्याची शक्यता आहे
Guleli IIT

Guleli IIT

Dainik gomantak

गुळेली : 19 डिसेंबर रोजी ग्रामसभेला एकमेव पंचसदस्य वगळता बाकी सर्व पंच अनुपस्थितीत राहिल्याने, गुळेली पंचायत क्षेत्रातील नागरीकांनी या विरोधात काल पासून सुरु केलेले आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार आज मेळावली पंचक्रोशी ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांनी केला आहे.

आज सकाळपासून मोठ्याप्रमाणात नागरिक पंचायत कार्यालयाकडे जमले होते. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात भरणा होता. पंचायत कार्यालयातच ठांड मांडून या महिला बसल्या होत्या. तर युवक व ग्रामस्थ आजूबाजूला उभे होते.

मेळावली आयआयटी (IIT) प्रकरणात यख भागातील ग्रामस्थावर गुदरण्यात आलेल्या तक्रारी सरकार ने मागे घ्याव्यात. तसचे या भागातील जे नागरिक गेली अनेक वर्षे ज्या जमिनी कसत आहेत त्या जमिनी त्यांच्या नावावर करून द्याव्यात. त्याचबरोबर मेळावली भागातील जमीन आय आय टी नावे केली आहे, ती तात्काळ रद्द करावी, आय आय टी प्रकरणात नाहक गोवून ज्या सरकारी खात्यातील युवकांची बदली इतरत्र दुरस्थ केली आहे. ती रद्द करुन त्यांना पूर्वीच्या ठिकाणी आणावे अशा काही मागण्या पंचायतीला सादर केल्या होत्या .

<div class="paragraphs"><p>Guleli&nbsp;IIT</p></div>
'गोव्यातील तरुणांना दरमहा 3000 बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन'

त्यावर 12 डीसेंबर च्या ग्रामसभेत चर्चा होऊन पुढील ग्रामसभेत यावर उत्तर देण्यात येईल असेही सांगण्यात आले होते परंतु 19 रोजी पंचायत मंडळच गैरहजर‌ राहिल्याने ग्रामसभा होऊ शकली नव्हती. मागण्या मान्य होईपर्यंत पंचायतीसमोर आंदोलन सुरू राहणार आहे.

मेळावली पंचक्रोशी ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आमच्या पासून पंचायत मंडळ पळत आहे आम्हाला सामोरे जाऊन त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला पाहिजे होती. परंतु, असे काही होत नाही त्यामुळे कुठेतरी पाणी मुरते‌आहे. यासाठी या संपूर्ण प्रकरणाची जो पर्यंत चौकशी‌होत नाही आणि आम्हाला उत्तरे मिळत नाहीत तो पर्यंत आम्ही येथून हटणार नाही. सरकारने आमचा अंत पाहू नये आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो.

या मेळावली पंचक्रोशी ग्रामबचाव आंदोलन (Movement) समितीचे उपसमन्वयक शुभम शिवोलकर म्हणाले की जे काही खटले आमच्यावर सरकारच्या विविध खात्याकडून लादण्यात आले आहेत. ते तात्काळ मागे घ्यावे तसेच आमचे एक ग्रामबांधव सिद्धू गावकर यांच्यावर विश्वजित राणे यांनी खटला घातला‌आहे, तो पण त्यांनी मागे घ्यावा. त्याच बरोबर आमच्या पंचायत क्षेत्रातील लता गावकर ह्या अपंग आहेत, त्यांची केलेली बदली तात्काळ रद्द करुन त्यांना पूर्वीच्या जागी आणावे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आमच्या भावनांशी‌ न खेळता‌ तात्काळ यावर तोडगा काढावा‌, नाहीतर हे प्रकरण त्यांना जड जाणार आहे.

<div class="paragraphs"><p>Guleli&nbsp;IIT</p></div>
झालोर येथे समुद्र किनाऱ्यावर गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन

ऐन निवडणुकीच्या (Election) तोंडावर आयआयटी आंदोलनाने परत एकदा उचल खाल्ली असून यामुळे काही प्रमाणात याची झळ जी आहे ती विद्यमान सरकारला बसण्याची शक्यता आहे.

मागे या आय आय टी प्रकरणात सत्तरीतील जमिन मालकीच्या प्रश्नाने उचल खाल्ली होती आणी सत्तरीतील गावेच्या गावे या आंदोलनात सहभागी झाली होती.आता परत एकदा हा विषय पुढे आला असून परत या मेळावली ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी सत्तरीतील त्याचबरोबर इतर तालुक्यातील जनता पुढे येऊ लागली तर एका नव्या समस्येला सरकारला तोंड द्यावे लागेल आणि विरोधकांना आयतेच कोलीत मिळणार असे मत जाणकार व्यक्त करु लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com