Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्याला 'यलो अलर्ट'; पुढील पाच दिवस बरसणार मुसळधार

रेनकोट, छत्रीशिवाय बाहेर पडू नका; आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

दैनिक गोमन्तक

Goa heavy rainfall : मॉन्सूनला सुरवात होऊनही बिपरजॉय चक्रीवादळ, अल निनो तसेच सातत्याने होणारे हवामानातील बदल यांमुळे मौसमी पावसाचा वेग मंदावला होता. त्यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले होते. उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. अखेर शुक्रवारी राज्यात मौसमी पाऊस गतिमान झाला.

बंगालच्या उपसागरातील मौसमी वारे सक्रिय झाल्याने गोव्यासह कोकण किनारपट्टी तसेच कर्नाटकच्या काही भागांत शनिवारपासून पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

राज्यात मॉन्सूनला सुरवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ ६ इंच पाऊस पडला आहे. वास्तविक आतापर्यंत २५ इंच पाऊस पडणे अपेक्षित होते. सद्यस्थितीत राज्यात ६९ टक्क्यांहून अधिक पावसाची कमतरता आहे.

येत्या काही दिवसांत ही कमतरता भरून निघणार असून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा वेधशाळेने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

२४ तासांत २४ मि.मी.

शुक्रवारी सकाळपासून राज्यात दमट वातावरण होते. काळे ढग सरकत होते. मात्र, सकाळी काही भागांत पावसाच्या सरी बरसल्या. संध्याकाळी ४ च्या सुमारास राज्यात सर्वत्र रिमझिम सरी बसरल्याने लोकांना उष्म्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.

वातावरणातील आर्द्रतेत घट झाल्याने थंडावा निर्माण झाला. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २४ मि.मी. पाऊस पडला असून सर्वाधिक केपे, त्याखालोखाल मुरगाव, केपे, सांगे, म्हापसा आदी भागांत पाऊस पडला.

धरणे तहानलेलीच

राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी धरणे अद्यापही पाण्याला भुकेलेलीच आहेत. गेल्या पंधरा वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा या धरणांमध्ये शिल्लक आहे. पाऊस सुरू झाल्याचा दिलासा असला तरी जलस्रोत खात्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केले असून शनिवारी अस्नोडा ते पडोसे या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जुन्या जलवाहिनीची चाचणी घेण्यात येणार आहे.

धरणे तहानलेलीच

राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी धरणे अद्यापही पाण्याला भुकेलेलीच आहेत. गेल्या पंधरा वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा या धरणांमध्ये शिल्लक आहे.

पाऊस सुरू झाल्याचा दिलासा असला तरी जलस्रोत खात्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केले असून शनिवारी अस्नोडा ते पडोसे या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जुन्या जलवाहिनीची चाचणी घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT