राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) रद्द करून जूनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याची मागणी आज ऑल गोवा नेव्हल सिव्हिलियन एमलॉईज युनियन तर्फे आंदोलन करुन करण्यात आली.
वाडे वास्को येथे गोवा नेव्हल एरिया मुख्यालयाच्या मुख्य गेट समोर युनियनतर्फे आंदोलन करत ही मागणी केली. 19 ते 24 जून 2023 हा निषेध आठवडा म्हणून पाळून या कालावधीत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली रद्द करून जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याच्या विषयावर आंदोलनाचा कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार आज वास्कोत ऑल गोवा सिविलियन एम्प्लॉईज युनियन तर्फे गोवा नेव्हल एरीया आणि नेव्हल एव्हिएशन मुख्यालयासमोर आंदोलन छेडले.
'सरकारी कर्मचारी राष्ट्रीय महासंघाची 20 एप्रिल 2023 रोजी आभासीपद्धतीने बैठक झाली. यात नवीन पेन्शन प्रणालीच्या विरोधात काही निर्णय घेण्यात आले. आम्ही राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या सुरुवातीपासून विरोधात आहे. आम्ही अनेक आंदोलने कार्यक्रम आयोजित केले आणि आम्हाला अनेकदा यश मिळाले पण आम्ही समाधानी नाही. सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळाची संपूर्ण सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात योजना अद्याप अक्षम आहे.' असे युनियनचे सरचिटणीस के प्रकाश यांनी म्हटले आहे.
जुन्या पेन्शन पद्धतीत मिळणारी ग्रॅच्युइटी नवीन पेन्शन योजनेत दिली जात नव्हती, मात्र 29 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय मजदूर संघाने दिल्लीत मोठे आंदोलन केल्यानंतर नवीन पेन्शन योजनेत ग्रॅच्युइटी लागू करण्यात आली. याशिवाय, बोनसची कमाल मर्यादा 3,500 वरून 7000 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
शिवाय एनपीएस मधील कामगार कुटुंब देखील सीसीएस पेन्शन नियम, 2021 अंतर्गत पेन्शनसाठी पात्र ठरले आहे. अशाप्रकारे,सरकारशी चर्चा करुन अनेक संघर्षांनंतर सरकारला नवीन पेन्शन योजनेत अनेक बदल करावे लागले. असेही के प्रकाश यांनी म्हटले.
बीपीएमएसच्या निर्देशानुसार नवीन पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन प्रणाली लागू करावी यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही युनियनचे सरचिटणीस के.प्रकाश म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.